S M L

मुंबईत पैशांनी भरलेले 4 ट्रक जप्त

Sachin Salve | Updated On: Jul 2, 2013 05:49 PM IST

मुंबईत पैशांनी भरलेले 4 ट्रक जप्त

news mumbai02 जुलै : इन्कम टॅक्स आणि मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री मुंबई सेंट्रल स्टेशनवर टाकलेल्या छाप्यांमध्ये अक्षरशः घबाड हाती लागलंय. यात हजारो कोटींची रक्कम आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंबंधी अचंबित करणारी माहिती हाती येतेय. यामध्ये एकूण 6 ट्रक होते, त्यातले 4 जप्त करण्यात पोलीस आणि आयकर विभागाला यश आलंय.

यातल्या प्रत्येक ट्रकमध्ये 150 बॅग होत्या. अशा एकूण 600 बॅगा सापडल्या आहेत. त्यापैकी 200 बॅगांमध्ये हिरे सापडलेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात दहशतवादाचा सध्यातरी संबंध दिसत नाही. एनआयएनं यासंबंधी फक्त माहिती दिली होती, असं आयकर विभागानं सांगितलं. हा हवालाचा पैसा असल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे.

या कारवाईत एकूण 47 लोकांना अटक करण्यात आलीय. 140 गोण्यांमध्ये भरलेले हे दागिने आणि पैसे एका कुरिअर बॉयच्या मार्फत मुंबईतून गुजरात राज्यात रवाना होणार असल्याची माहिती इन्कमटॅक्स विभागाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून हा छापा टाकण्यात आला. हा माल घेऊन चार ट्रक स्टेशनजवळ येताच हा माल उतरवण्यााधीच तो पकडण्यात आला. हा माल गुजरातच्या अहमदाबाद, बडोदा आणि राजकोट परिसरात वितरीत करण्यासाठी नेला जात होता. ही रक्कम इतकी इतकी जास्त आहे की ती मोजण्यासाठी तब्बल 20 तास लागतील अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2013 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close