S M L

बाळाच्या हरवण्याकडे पोलिसांचं दुर्लक्ष - मोहिनी नेरुरकरांची तक्रार

18 जानेवारी, मुंबईअलका धुपकरएक जानेवारीला सायन हॉस्पिटलमधून चार दिवसांचा एक मुलगा चोरीला गेला. मोहिनी आणि मोहन नेरुरकर यांचा हा मुलगा होता. तब्बल 17 दिवसांनी मोहिनी नेरुरकर यांनी शनिवारी डिस्चार्ज घेतला. पण हॉस्पिटलमधला स्टाफ टोमणे मारायचा आणि पोलिसांनी चुकीचं स्टेटमेंट लिहून घेतलं, असे दोन आरोप मोहिनी नेरूरकर यांनी ' आयबीएन लोकमत 'शी बोलताना केलेत.सायन हॉस्पिटलमध्ये जन्म दिलेल्या मोहिनी नेरूरकर यांच्या बाळाचा शोध हॉस्पिटल आणि प्रशासन लावू शकलेलं नाही. बाळाची मोहिनी नेरूरकर यांनी जेव्हा ' आयबीएन - लोकमत' कडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तेव्हा त्यांना त्यांचे अश्रू आवरताना कठीण गेलं. त्या घटनेविषयी मोहिनी नेरुरकर सांगतात, " मी माझ्या बाळाला कॉटपाशी ठेवून कपडे धुवायला म्हणून आत गेले होते. बाहेर येवून पाहिलं तर काही बाळ दिसलं नाही. मी बरराच वेळ आतमध्ये शोधाशेध केली. माझ्या शेजारच्या बाईंना विचारलं तर त्यांनी एक काळी सावळी गरोदर बाई बाळाला घेऊन गेल्याचं सांगितलं. मी खालपर्यंत ओरडत गेले... पण मला काही बाळ मिळालं नाही. जी बाई बाळाला घेऊन गेली तिची आणि माझी काही ओळख-पाळख नव्हती. या सगळ्या प्रकारात मनस्ताप झाला तो पोलिसांचा. त्यांनी माझं चुकीचं स्टेटमेन्ट लिहून घेतलं. आता मला फक्त माझं बच्चू हवं आहे." खरंतर नेरूरकर दाम्पत्य इतक्या लवकर डिस्चार्ज घेणार नव्हतं. " आम्ही लवकर डिस्चार्ज घेणार नव्हतो. पण माझ्या घरी दोनं मुलांकडे दुर्लक्ष होतं म्हणून डिस्चार्ज घ्यावा लागलाय, " अशी माहिती हरवलेल्या बाळाचे बाबा मोहन नेरूरकर यांनी दिली.मोहिनी नेरूरकरांचं हॉस्पिटल आणि पोलीस प्रशासनाविषयीची तक्रार ऐकण्यासाठी व्हिडिओ क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2009 08:26 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2009 08:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close