S M L

राज्यभरात पावसाचे धुमशान

Sachin Salve | Updated On: Jul 3, 2013 04:49 PM IST

Image img_170132_kokanrain_240x180.jpg03 जुलै : राज्यभरात पावसाने 'जुलै ओपनिंग' सुरू केली आहे. कोकणाला मंगळवारपासून पावसानं झोडपून काढलंय. रत्नागिरीमध्ये कासे गावात डोंगर खचलाय. त्यामुळे घरांवर दरड कोसळली. त्यामुळे 55 कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे. चिपळूण-संगमेश्वर भागाला पावसाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. या तालुक्यातल्या 20 गावांचा संपर्क तुटला. तर 30 गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला. संगमेश्वरच्या कासे गावात एक शाळकरी मुलगी वाहून गेल्याची माहिती आहे. तर सिंधुदुर्गातल्या मसुरे गावात पाणी शिरलंय.

मंगळवारी पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग काही काळासाठी बंद झाला होता. आज या महामार्गावरची वाहतूक पुर्वपदावर आली आहे.  दिलासादायक गोष्ट म्हणजे कोकण रेल्वेची वाहतूक आज पहाटेपासून पुन्हा सुरू झालीये. तर तिकडे नागपूरमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. काल रात्रीपासून सुरू झालेला पाऊस अजून थांबलेला नाही. पावसामुळे आज काही शाळांनी सुट्टी देण्यात आलीय. याबाबतचा निर्णय शाळांनीच घ्यावा अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्यात. मराठवाड्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली. जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झालीये. आजही पाऊस सुरू असून रात्री तब्बल 220 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालं. प्रामुख्यानं मंठा तालुक्यातल्या देवठाणा, केंदळी, अवलगाव, खारीआरडा, गेवराई, विडोळी, बरबडा या भागात शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्या भागामध्ये मुख्यतः कापूस आणि सोयाबीनचं पीक घेतलं जातं, ते सर्व पीक पावसानं वाहून गेलं. यामुळे शेतकर्‍यांचं लाखो रूपयांचं नुकसान झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2013 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close