S M L

भररस्त्यात दलित महिलेला पेटवलं

Sachin Salve | Updated On: Jul 4, 2013 05:08 PM IST

भररस्त्यात दलित महिलेला पेटवलं

latur344233404 जुलै : लातूर जिल्ह्यात अंगावर शहारा आणणारी धक्कादायक घटना घडलीय. जळकोट तालुक्यातल्या ढोरसांगवी गावात एका दलित महिलेला भररस्त्यात पेटवून देण्यात आलं. तीन तरुणांनी बाजारात आलेल्या या महिलेला रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं.

 

जखमी अवस्थेत या महिलेला उदगीरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. ही महिला तब्बल 65 ते 70 टक्के भाजली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. सध्या ती मृत्यूशी झुंज देतेय. महिलेचे पती मुंबईत कामानिमित्तानं वास्तव्यास आहेत. तर ही महिला सासू आणि आपल्या 6 वर्षाच्या मुलासह मोल मजुरी करून चरितार्थ चालवत होती. या प्रकरणी जळकोट पोलिसात ऍट्रोसिटी, विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न असे 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरू आहे. या महिलेला का जाळण्यात आलं याचा शोध पोलीस घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2013 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close