S M L

बेगम बर्वे नाटकाला प्रेक्षकांची तुफान गर्दी

18 जानेवारी, मुंबई माधुरी निकुंभ सतीश आळेकर लिखीत दिग्दर्शित ' बेगम बर्वे ' या नाटकाचा गेल्या तीस वर्षापूर्वी पहिला प्रयोग झाला. एकूण चारच पात्र असलेल्या या नाटकाचा प्रयोग नुकताच मुंबईत झाला अणि तोही हाऊसफुल्ल . या प्रयोगाला चित्रपट आणि नाट्यसृष्टीतली बरीच मंडळी उपस्थित होती. एखादी कलाकृती साकारली गेली आणि सातत्याने तिच्यावर काम केलं गेलं म्हणजे ती प्रौढ आणि प्रगल्भ होते असं म्हणतात आणि अगदी तसंच काहीसं बेगम बर्वे या नाटकाबद्दल बोलता येईल. गेल्या तीस वर्षांपासून हे नाटक रंगभूमीवर साकारलं जातंय आणि तेही मूळ कलाकारांकडूनच. या नाटकात लेखक दिग्दर्शक सतीश आळेकर, कलाकार आणि गायक चंद्रकांत काळे, अभिनेते मोहन आगाशे आणि कलाकार रमेश मेढेकर हे मूळ कलाकार काम करता आहेत. हे चौघंहीजण स्वत:च्या आणि एकमेकांच्या कामावर खूश आहेत. " सतीश आळेकर जेव्हा जेव्हा आम्ही चौघे कलाकार एकत्र येतो. तालिम करतो. तेव्हा तेव्हा आम्हाला आमच्या कलाकृतीतला आनंद अनुभवयाला मिळतो, असं मत लेखक दिग्दर्शक सतिश आळेकर यांनी व्यक्त केलं. " वेगवेगळ्या विश्वात राहणा-या 4 माणसांच्या मनाचा तळ या नाटकातून शोधण्याचा प्रयत्न केलं आहे. त्यामुळे ते नाटक करतानाही आनंद होतो, " असं कलाकार मोहन आगाशे म्हणाले. नाटकावर संगीताचा प्रभाव आहे.आयुष्यात घडणार्‍या घटनांची आणि संगीताची सांगड घालत नाटकात बेगमचं भावविश्व गुंफलं गेलं आहे. यात बेगम ही स्त्रीव्यक्तीरेखा रंगवली आहे चंद्रकांत काळे यांनी. " नाटकात संगीताच्या माध्यमातून सांगण्यासारखं खूप काही आहे.आणि ते मी समजून उमजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, " असं मत कलाकार चंद्रकांत काळे यांनी व्यक्त केलंय. " हे नाटक करताना खूप एनर्जी लागते. त्या एनर्जीचा अभ्यास आमच्या दिग्दर्शकांनी आमच्याकडून त्यावेळेला करून घेतला आहे. त्यामुळे आता काम करताना सोपं जातं," असं रमेश मेढेकर म्हणाले. माणसाच्या आयुष्यात तो दिवा स्वप्न पाहतो आणि मग त्या स्वप्नात रमुन तो त्याचं भावविश्व रंगवतो. एका क्षणाला तो हे सगळं काल्पनीक आहे हे विसरून त्यात जगायला लागतो हेच नाटकात दाखवण्यात आलं आहे. नाटकाचा विषय एकाच वेळेत कळण्याइतका सोपा नसला तरी बेगम बर्वे सारख्या अवघडवळणाच्या नाटकालाही प्रेक्षक आवडीने येतात. " हे नाटक खूप दिवसांपासून पहायचं होतं. मी खूप लकी आहे की मला मूळ कलाकारांनी साकारलेलं नाटक पहायला मिळालं आहे, " असं अभिनेत्री गिरीजा ओक म्हणाली. त्यावरून ' बेगम बर्वेची नाटकाची तरूणाईत किती क्रेझ आहे. ते कळून आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2009 11:15 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2009 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close