S M L

नाशिकमध्ये 'खाप'पंचायत, अनेक कुटुंबांवर बहिष्कार

Sachin Salve | Updated On: Jul 4, 2013 05:52 PM IST

नाशिकमध्ये 'खाप'पंचायत, अनेक कुटुंबांवर बहिष्कार

04 जुलै : उत्तर भारतात खाप पंचायतींसारखा धक्कादायक आणि लाजवेल असा प्रकार आता पुरोगामी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्हयात उघड झाला आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून जात पंचायतीनं अनेक कुटुंबांवर बहिष्कार घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

प्रमिला हत्याकांड जातीच्या दबावातून झाल्याची शक्यताही पुढे येतेय. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी जोशी समाजातल्या 6 पंचांना अटक केली आहे. शहरातल्या पंचवटीत दर महिन्याला जोशी समाजाची पंचायत भरते. त्या पंचायतीतून आंतरजातीय विवाह करणार्‍या कुटुंबांना समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेण्यात आले.

या कुटुंबांना कोणत्याही लग्न कार्यात सहभागी होऊ दिलं जात नाही. त्यांच्या घरच्या कार्यात जातीच्या लोकांना सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली. हे नियम मोडणार्‍यांना हजारो रुपयांचा दंड करणे, मारझोड करणं असे अत्याचारही करण्यात आल्याच्या या कुटुंबांच्या तक्रारी आहेत. गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये या सर्व कुटुंबांनी तक्रारी केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2013 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close