S M L

अमरावतीत धूम बैलगाडीच्या शर्यतींची

18 जानेवारी, अमरावतीअमरावती जवळच्या तळेगावजवळ दरवर्षी शंकरपट भरतो. 112 वर्षाची परंपरा असलेला हा शंकरपट बघायला लोकांची गर्दी होते. तसंच इथलं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कुरमुरे फुटाण्यांचा चिवडा. 4 दिवसात इथे 40 लाखांचा चिवडा विकला जातो. शंकरपट म्हणजे बैलगाड्यांची शर्यत. तळेगावच्या दशासरला शंकर पटाची 112 वर्षांची परंपरा आहे. या बैलगाड्यांच्या शर्यती पहायला हजारो लोक येत असतात. महिलाही शंकरपटात भाग घेतात. या शंकरपटाचं वैशिष्ट्य म्हणजे इथला चिवडा. या चिवड्याची चव घेण्यासाठी विदर्भातून लोक येतात. कुम-याच्या चवदार चिवड्याचा खप 40 लाख्यांच्या आसपास जात असतो. शेतकर्‍यांसाठी विरंगुळा म्हणून या शंकरपटाचे आयोजन केलं जातं. दरवर्षी या शर्यती दरम्यान या गावात मोठी यात्राही भरते. शंकरपटातला मुरमुरे फुटाण्यांचा चिवडा सगळ्यांना या यात्रेत खेचतो. हेच या यात्रेचं आगळं वेगळं महत्त्व आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2009 06:28 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2009 06:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close