S M L

एकलहरे विद्युत केंद्रात राखेच्या विक्रीत घोटाळा

Sachin Salve | Updated On: Jul 4, 2013 07:25 PM IST

एकलहरे विद्युत केंद्रात राखेच्या विक्रीत घोटाळा

नाशिक 04 जुलै : इथं एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राच्या राख संकलनासाठी बिलं थकवलेल्या कंपन्यांनाच टेंडर प्रक्रियेत सहभागी करून घेतल्याच्या तक्रारी होत आहेत. या औष्णिक विद्युत केंद्रात दररोज 3 हजार मेट्रीक टन राख तयार होते. ही राख हवेत पसरून मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होतंय. ते रोखण्यासाठी बांधकामात या राखेचा वापर करणार्‍या कंपन्यांना ती देण्यात यावी असा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा नियम आहे.

 

ही राख उचलून बांधकाम साहित्यात वापरण्यासाठी विकण्यात येते. आतापर्यंत डर्क इंडिया आणि ऍडव्हेंचर प्रोसेसिंग या कंपन्यांना हे ठेके देण्यात आले होते. मात्र, डर्क इंडियानं महाजनकोचा करार मोडला तर एडव्हेंचरनं 11 लाखांची थकबाकी केली आहे. मात्र, ऍडव्हेंचर प्रोसेसिंगला पुन्हा एकदा या टेंडर प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आलंय. तर, डर्क इंडिया दुसर्‍याच एका कंपनीच्या बुरख्याआडून पुन्हा प्रवेश करणार असल्याची तक्रार आहे. मात्र, ऍडव्हेंचर प्रोसेसिंग थकबाकीदार आहे, पण हप्ते भरत आहेत. अंबुजा आणि डर्क या वेगळ्या कंपन्या आहेत असं स्पष्टीकरण महाजनकोनं दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2013 07:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close