S M L

लेखक बाळ सामंत यांचं निधन

18 जानेवारी, मुंबईमराठीतील ज्येष्ठ साहित्यिक आणि स्तंभलेखक बाळ सामंत यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. गेले काही दिवस ते मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. ते 85 वर्षांचे होते. त्यांचा जन्म 27 मे 1924 मध्ये झाला. एम.ए. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी सुरुवातीला पत्राकारिता केली. ' नवशक्ती ' , ' लोकसत्ता ' या वृत्तपत्रातून त्यांनी स्तंभलेखनही केलंय. विनोदकार म्हणून ते जास्त परिचित आहेत. ' खिरापत ', ' नवरा-बायको ', ' करामत ' , ' खुषमस्करी ' असे त्यांच्या विनोदी लेखांचे आणि कथांचे संग्रह प्रकाशित झालेयत. ' तो राजहंस एक ' हे त्यांचं बालगंधर्वांवर आधारित चरित्रात्मक पुस्तकंही प्रसिद्ध झालं आहे. त्याशिवाय हिटलर -एक महान शोकांतिका , आणि 'मरणात खरोखर जग जगते' ही त्यांची पुस्तकंही गाजलेयत. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हे त्यांच्या साहित्यसंपदेतले अजून एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे. " बाळ सामंत यांच्या जाण्यानं एका चतुरस्त्र कलाकार गेल्याची खंत सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी व्यक्त केली आहे. " दुस-यांना मदत करणं दुस-याच्या उपयोगी पडणं हे बाळ सामंत यांचे महत्त्वपूर्ण गुण असल्याचेही वसंत सरवटे यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2009 12:58 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2009 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close