S M L

इस्त्राएलचा गाझामध्ये युद्धविराम

18 जानेवारीमध्यपूर्वेत आता शांतता प्रस्थापित होतेय. गाझा पट्टीत इस्त्रायलनं तात्पुरता युद्धविराम जाहीर केला आहे. तीन आठवड्यांपूर्वी सुरू केलेले हल्ले थांबवण्याचा निर्णय इस्रायलनं घेतलाय. मात्र इस्रायलचं सैन्य गाझा पट्टीत असेपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा हमासनं दिला आहे.तीन आठवड्यांच्या घनघोर युध्दानंतर गाझा पट्टीत बंदुकीच्या फैरी ठंडावणार आहेत. इस्राएलनं इथं आता तात्पुरता युद्धविराम जाहीर केलाय. तेल अविवमध्ये शनिवारी रात्री झालेल्या उच्च स्तरीय सुरक्षा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. "हल्ल्याचा हेतू जवळपास साध्य झालाय, हमासला आम्ही मोठा धक्का दिला आहे. त्यांना लष्करीदृष्ट्याच नाहीतर त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चही आम्ही उद्धवस्त केलं आहे." असं इस्त्राएलचे पंतप्रधान एहुद ऑलमर्ट म्हणाले.असं असलं तरी या भागात शांतता प्रस्थापित होण तसं कठीण आहे. हमासनंही आता इस्राएलला इशारा दिलाय. जोपर्यंत इस्राएलच्या फौजा गाझापट्टीत आहेत, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा हमासनं दिला आहे. "ऑलमर्ट यांचा हा पराभव असल्याचं स्पष्ट आहे. एक अपयशी सरकार चालवण्यासाठी त्यांनी घेतलं आणि आता त्यांची टर्मची अपयशी सरकार म्हणूनच संपणार आहे. जोपर्यंत इस्राएलचेसैनिक गाझा पट्टीत आहेत तोपर्यंत हमास माघार घेणार नाही." असं हमासच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.गाझा पट्टीतले हल्ले थांबवण्यासाठी इस्राएलवर मोठ्याप्रमाणात आंतरराष्ट्रीय दबाव होता. या हल्ल्यांमध्ये जवळपास एक हजार लोक मारले गेले. त्यात चारशे लहान मुलांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं शनिवारी तातडीनं हा संघर्ष थांबवण्याचं सांगताच ही कारवाई इस्राएलला थांबवावी लागली. तज्ज्ञांच्या मते दोन्ही बाजूनं जाहीर करण्यात आलेल्या या युद्धविरामाचा फायदा इस्राएला होऊ शकतो. आपल्या दुर्दशेला हमासच जबाबदार असल्याचं गाझामधल्या नागरिकांना वाटल्यास हमासच्या दृष्टीनं ही बाब नुकसानकारक ठरू शकते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2009 05:15 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2009 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close