S M L

अनुवांशिकतेमुळे होणार्‍या कॅन्सरवर उपाय सापडला

18 जानेवारी, मुंबईअलका धुपकरकॅन्सरची बाधा कधीच होऊ शकणार नाही, याची खात्री कोणी देऊ शकेल काय ? होय अशी खात्री दिलीय लंडनच्या युनिवर्सिटी कॉलेज हॉस्पिटनं. या हॉस्पिटलमध्ये जगातलं पहिलं असं बाळ जन्माला आलंय, ज्याला कधीच कॅन्सरची बाधा होणार नाही. जगभरात एकूण कॅन्सर पेशंटपैकी पाच टक्के पेशंट हे अनुवंशिकतेमुळे कॅन्सरचे बळी ठरलेले असतात. पण लंडनमध्ये झालेल्या या संशोधनंतर अनुवंशिकतेमुळे होणारा कॅन्सर, बाळ जन्माला येण्याआधीच रोखता येणार आहे. यालाच प्री इम्प्लांटेशन टेस्टिंग असं म्हणतात.लंडनच्या या ऐतिहासिक केसमध्ये विवाहित दाम्पत्यापैकी नवर्‍याच्या कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट होते. त्यामुळे अनुवांशिकतेने बाळामध्ये कॅन्सर येण्याची शक्यता होती. त्यासाठी त्यांनी आयव्हीएफ ट्रीटमेंटचा आधार घेतला. गर्भ फलित झाल्यानंतर सर्व भ्रूण तपासण्यात आले. ज्या भ्रूणामध्ये कॅन्सरचे जीनआढळले नाहीत. तेच भ्रूण आईच्या गर्भाशयात सोडण्यात आले. त्यामुळे या जोडप्याच्या मुलीला कधीच कॅन्सर होणार नाही.टाटा हॉस्पिटलच्या संशोधन विभागातर्फेही अशाप्रकारचं जेनेटिक टेस्टिंग केलं जातं. "भारतात केवळ दोन ठिकाणी असं टेस्टिंग होतं. एक चेन्नई आणि दुसरं मुंबईतलं टाटा हॉस्पिटल. इथे आम्ही फक्त पेशंटच नाही तर त्यांच्या नातेवाईकांनाही कौन्सेलिंगची सुविधा पुरवतो. त्यामुळे पआथमिक अवस्थेतच कॅन्सर डिटेक्ट करता येऊ शकतो." असं टाटा रिसर्च सेन्टरचे संचालक डॉ. राजीव सरीन यांनी सांगितलं.जीनमधलं म्युटेशन म्हणजेच जीनमध्ये असलेली विकृती ही देखील विविध प्रकारची असते. "आमच्या असं लक्षात आलं आहे की वेगवेगळ्या कम्युनिटींमध्ये वेगवेगळं म्युटेशन आढळून येतं. म्हणजे कोकणस्थ ब्राम्हणांमध्ये वेगळं, कोचीन आणि मुंबईच्या ज्यूंमध्ये वेगळं, इस्त्रएलमधून येणार्‍यांमध्ये ब्रेस्ट आणि ओवरी कॅन्सरचं प्रमाण अधिक असतं. यामागच्या कारणांचा आम्ही तपास करत आहोत." असं डॉ. राजीव सरीन म्हणाले.भारतामध्ये दरवर्षी आनुवंशिक कॅन्सरचे 20 हजार पेशंट आढळतात. ही संख्या कमी करायला या संशोधनाचा नक्कीच फायदा होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2009 02:18 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2009 02:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close