S M L

इशरत आत्मघातकी हल्लेखोर, FBIने वर्तवली शक्यता

Sachin Salve | Updated On: Jul 5, 2013 11:05 PM IST

Ishrat Jahan05 जुलै : इशरत जहाँ ही आत्मघातकी हल्लेखोर होती, असं अमेरिकेच्या एफबीआय या गुप्तचर विभागाने 2009 मध्ये भारताच्या गुप्तचर संस्थेला सांगितलं होतं. 26/11 च्या हल्ल्यातला आरोपी डेव्हिड हेडलीच्या चौकशीदरम्यान ही माहिती मिळाल्याचं एफबीआयनं सांगितलं होतं.

 

गुप्तचर विभागाने ही माहिती केंद्र सरकारलाही दिली होती. हे पत्र सीएनएन आयबीएन फर्स्टपोस्ट डॉट कॉमच्या हाती लागलंय. या पत्रावरून स्पष्ट होतं की, इशरत आत्मघातकी हल्लेखोर असण्याची शक्यता आहे. पण, याबद्दलचा तपास कधी झाला नाही.

जेम्स हेडलीने इशरतबद्दल दिलेल्या माहितीचा एनआयएच्या चौकशीत कुठेही उल्लेख नाहीय. हेडलीनं इशरतचा केलेला उल्लेख हा केवळ ऐकीव माहितीवर केलेला आहे असं एनआयएचं म्हणणं आहे. एनआयएनं इशरतबाबत हेडलीची चौकशी केली होती का ?याबाबतही एनआयए मौन बाळगून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2013 07:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close