S M L

राष्ट्रवादीच्या नेत्याने उघडपणे वाटले पैसे

Sachin Salve | Updated On: Jul 6, 2013 05:39 PM IST

राष्ट्रवादीच्या नेत्याने उघडपणे वाटले पैसे

sangli ncp_4306 जुलै : सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते इब्राहिम चौधरी यांच्याकडून मतदारांना पैशाचे उघड वाटप करण्यात आल्याचं उघड झालंय. आचारसंहिता भंग करणार्‍या इब्राहिम चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची काँग्रेस उमेदवारांनी मागणी केलीय.

चौधरी यांचा मुलगा जुबेर चौधरी हा वॉर्ड क्रमाक 8 मधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभा आहे. आज इस्त्राईलमगर परिसरात इब्राहिम चौधरी आले होते. त्यांनी एका महिला मतदाराला पाचशे रुपये दिले आणि वॉर्ड क्रमांक 7 मधल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करायला सांगितले.

त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस उमेदवारांनी केली आहे. या अगोदरच इब्राहिम चौधरी यांना अपात्र ठरवण्यात आलंय. महापालिकेच्या इमारतीवर झालेल्या दगडफेक प्रकरणात त्याना 6 महिने सक्त मजुरी आणी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2013 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close