S M L

कर्नाटक परिवहनच्या महाराष्ट्रात येणा-या बस रद्द

19 जानेवारी, बेळगाव प्रकाश बेळगोजी15 जानेवारीला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड केली होती. त्यामुळे लातूरमध्ये कर्नाटकची बस जाळण्यात आली होती. तसंच पुण्यातही कर्नाटकच्या बसवर दगडफेक करण्यात आली होती. परिणामी कर्नाटकच्या, महाराष्ट्रात येणार्‍या बस रद्द करण्यात आल्यात. कर्नाटक परिवहननं हा निर्णय घेतलाय. कर्नाटकच्या महाराष्ट्रात येणा-या 185 बस रद्द करण्यात आल्या आहेत." जर महाराष्ट्रातले कार्यकर्ते कर्नाटकच्या बसची नासधूस करत असतील तर आम्ही महाराष्ट्रातल्या बसेसना कर्नाटकात पाय ठेवू देणार नाही, "असा पवित्रा घेत कर्नाटकचे परिवहनमंत्री आर. अशोक म्हणाले, " बेळगाव, बिजापूर, गुलदर्गा इथून कर्नाटकातून महाराष्ट्रात एकूण 400 बस सुटतात. त्यापैकी बेळगावच्या महाराष्ट्रात येणा-या 185 बसेस आम्ही रद्द केल्या आहेत." उत्तर कर्नाटकातून परिवहनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला सर्वात जास्त महसूल मिळतो. बेळगाव - महाराष्ट्र सीमावादाचा फटका कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या प्रवाशांना बसणार आहे. 15 जानेवारीला महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड केली होती.त्या सगळ्यांची आज सुटका करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीनं कर्नाटक सरकारच्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या विरोधात महामेळाव्याचं आयोजन केलं होतं. हा महामेळावा होऊ नये यासाठी कर्नाटकनं दंडेलशाहीचा वापर केला होता. तसंच माजी आमदार मनोहर किणीकर, तालुका एकीकरण समितीचे अध्यक्ष निंबोजी हुद्दार यांना अटकही केली होती. पण आज सकाळी त्यांच्यासह अन्य पाच नेत्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आलीय. कर्नाटकच्या, महाराष्ट्रात येणार्‍या बस रद्द करण्यात आल्यात.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2009 08:33 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2009 08:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close