S M L

ओबामांच्या शपथविधी समारंभाचं काउंट डाउन सुरू

19 जानेवारी, वॉशिंग्टनबराक ओबामा उद्या व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारणार आहेत. ओबामा उद्या शपथ घेणार असले तरी त्यांचं सेलेब्रेशन सुरू झालं आहे. काल ओबामांनी 56 व्या प्रेसिडेन्शियल कॉन्सर्टमध्ये भाग घेतला. ओबामांच्या 'वी आर वन' भाषणानं या सेलेब्रेशनची सुरुवात झाली. अमेरिका सध्या मंदी आणि दहशतवाद या दोन शत्रूंशी लढत असली तरी लवकरच यावर काबू मिळवू असं ओबामांनी यावेळी सांगितलं. या इनॉगरेशन कॉन्सर्टमध्ये बियॉन्से, शकिरा, जिमी फॉक्ससारख्या कलाकारांनी गाणी सादर केली. "मला वाटतं आपण कतर्क रहायला हवं. मुंबईत दहशतवाद्यांनी जे भीषण कृत्य केलं, ते इथेही होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण सावध रहायला हवं. या संध्याकाळी इथे परफॉर्म करणार्‍या प्रत्येकाचे मी आभार मानतो. अमेरिकेबद्दलचं तुमचं प्रेम तुम्ही गाण्यातनं आणि शब्दातनं व्यक्त केल्या. वॉशिंग्टनमध्ये तुमचं स्वागत. अमेरिकेच्या नव्या सुरुवातीच्या समारंभात तुम्हा सर्वांचं स्वागत" या शब्दात त्यांनी आपल्या भवना व्यक्त केल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2009 08:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2009 08:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close