S M L

'कॉलेजमध्ये पुन्हा एकदा निवडणुका घ्या'

Sachin Salve | Updated On: Jul 9, 2013 10:50 PM IST

'कॉलेजमध्ये पुन्हा एकदा निवडणुका घ्या'

Image img_234642_rajeshtopeon3463_240x180.jpg09 जुलै : कॉलेजमध्ये पुन्हा एकदा निवडणुका सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांकडून तशा मागणीचा प्रस्ताव आल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. याबाबत सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

 

कॉलेज परिसरात सेलफोन जॅमर?

 

दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून होणारा मोबाईलचा गैरवापर रोखण्यासाठी कॉलेज परिसरात सेलफोन जॅमर बसवता येईल का याची चाचपणी सरकारनं सुरू केलीय. त्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं राज्यभरातली कॉलेज आणि शिक्षणसंस्थांकडून सूचना मागवल्यात. पण मोबाईल जॅम करण्याच्या या कल्पनेला विद्यार्थी आणि कॉलेजच्या प्रिन्सिपल्सनी विरोध केलाय.

 

कारण याचा फटका केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर, प्रिन्सिपल, कॉलेजमधले कर्मचारी आणि बाहेरून येणार्‍या पाहुण्यांनाही याचा फटका बसणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेतही मोबाईलचा वापर होतो. त्यामुळे मोबाईल जॅमर बसवल्यास परीक्षा काळातही अडचणी निर्माण होतील, अशी भीती व्यक्त होतेय. पण अजून सरकारनं कुठलाच निर्णय घेतला नाही. परंतू महाविद्यालयानं तशी मागणी केल्यास याबाबत निर्णय होऊ शकतो, असं उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी म्हंटलय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2013 08:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close