S M L

ही घ्या,आरोपी आमदार-खासदारांची 'काळी' यादी !

Sachin Salve | Updated On: Jul 10, 2013 07:00 PM IST

sc ninrnya110 जुलै : देशातल्या कलंकित लोकप्रतिनिधींना चाप बसणारा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय. पण आजपर्यंत अनेक अशा आमदार खासदारांवर गुन्हे दाखल आहे. याची आकडेवारी जर पाहिली तर तुरूंग सुद्धा या नेत्यांना कमी पडेल अशीच आहे.

 

तब्बल 1 हजार 448 खासदार आणि आमदारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. तर 641 खासदार आणि आमदारांविरोधात बलात्कार आणि खुनाचे गुन्हे दाखल आहेत.. नॅशनल इलेक्शन वॉचनं दिलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आलीय. ज्या लोकप्रतिनिधींनी तुम्ही-आम्ही निवडून दिले त्या आमदार-खासदारांचा पाहा हा पराक्रम...

 

हे मंत्री खात आहेत तुरुंगाची हवा

- ओमप्रकाश चौटाला, माजी मुख्यमंत्री, हरियाणा

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने 10 वर्षांची शिक्षा सुनावलीय.

 - माया कोडनानी, माजी मंत्री, गुजरात सरकार

नरोडा पाटियात 2002 मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी 28 वर्षांची शिक्षा

- शिबू सोरेन, माजी मुख्यमंत्री, झारखंड

2006मध्ये दिल्लीतल्या जिल्हा कोर्टाने सोरेन यांना स्वीय सहाय्यकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेप सुनावली. पण, दिल्ली हायकोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली.

- मधू कोडा, माजी मुख्यमंत्री, झारखंड

उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीच्या प्रकरणात नोव्हेंबर 2009पासून तुरुंगात, प्रकरण अजून प्रलंबित

 

लोकप्रतिनिधींचा पराक्रम

- तब्बल 1 हजार 448 खासदार आणि आमदारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल आहेत

- 641 खासदार आणि आमदारांविरोधात बलात्कार आणि खुनाचे गुन्हे दाखल आहेत

- 6 खासदार आणि आमदारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरोधात बलात्कारचे गुन्हे दाखल असल्याचं नमूद केलंय

- 141 खासदार आणि आमदारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरोधात खुनाचे गुन्हे दाखल असल्याचं नमूद केलंय

- 352 खासदार आणि आमदारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्नाचे गुन्हे दाखल असल्याचं जाहीर केलंय

- 145 खासदार आणि आमदारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरोधात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं जाहीर केलंय

- 90 खासदार आणि आमदारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरोधात अपहरणाचे गुन्हे दाखल असल्याचं नमूद केलंय

- तर 75 खासदार आणि आमदारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरोधात दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याचं नमुद केलंय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2013 06:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close