S M L

लखनभैय्या एन्काउंटर :13 पोलिसांसह 21 जणांना जन्मठेप

Sachin Salve | Updated On: Jul 13, 2013 03:47 PM IST

लखनभैय्या एन्काउंटर :13 पोलिसांसह 21 जणांना जन्मठेप

lakhan bhai12 जुलै : 2006 मध्ये झालेल्या लखन भैय्या बनावट चकमक प्रकरणी सर्वच्या सर्व सेशन्स कोर्टाने 21 आरोपींना जन्मठेपचे शिक्षा सुनावली आहे. या 21 जणांमध्ये 13 पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. या प्रकरणात 5 जुलैला एन्काउंटर फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी 13 पोलिसांवर खून, खुनाचा कटाच्या आरोपांखाली कोर्टाने दोषी ठरवलं होतं. एखाद्या खटल्यात पहिल्यांदाच पोलिसांना जन्मठेप झाल्याचा हा निर्णय आहे.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार असल्याच्या संशयावरून लखनभैय्या ऊर्फ रामनारायण गुप्ताचा 11 नोव्हेंबर 2006 रोजी वर्सोवा येथील नाना-नानी पार्कजवळ एन्काउंटर केला. छोटा राजनसोबत संबंध असल्याचे अनेक पुरावे पोलिसांकडे होते. एवढेच नाही तर लखनवर गुन्हेही दाखल होते. मात्र एन्काउंटर होण्यापुर्वी लखनचं वाशीतून अपहरण करण्यात आलं असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळाली होती. त्याचे भाऊ ऍड. रामप्रसाद गुप्ता यांनी मुंबई,ठाणे आणि नवीमुंबई पोलिसांना फॅक्सद्वारे लखनच्या जीवाला धोका आहे अशी माहिती दिली होती.

 

मात्र ही माहिती मिळून सुद्धा लखनचं एन्काउंटर करण्यात आलं. लखनची हत्याच करण्यात आली असा दावा त्याचा कुटुंबीयांनी केली. त्यांनी न्यायालयात यासंबंधात याचिका दाखल केली. अंधेरी कोर्टाने लखनची हत्या करण्यात आली असं निरीक्षण होतं आणि पुढील निर्णयासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे अहवाल सुपूर्द केला. उच्च न्यायालयाने डॉ. गुप्तांचा तक्रार जबाब म्हणून नोंदवण्यात यावं आणि एसआयटी मार्फत चौकशीचे आदेश दिले. न्यायालयाच्या निर्णयानंतर एसआयटीने या प्रकरणी अपहरण,हत्या अशा गुन्ह्याची नोंद केली. यानंतर 7 जानेवारी 2010 रोजी एसआयटीने प्रदीप शर्मांसह 13 पोलिसांना अटक केली. तीन वर्षानंतर या खटल्याची सुनावणी झाली. 5 जुलै रोजी प्रदीप शर्माला या प्रकरणात निर्दोष मुक्तता कऱण्यात आली तर आज 13 पोलिसांसह 21 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2013 04:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close