S M L

आशू-साजीदचं भांडण गाजलं

20 जानेवारी, मुंबई यंदाच्या स्टार-स्क्रीन पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलं ते आशुतोष गोवारीकर आणि साजीद खान यांच्यातल्या वादानं. सोहळ्यात आशुतोष गोवारीकर आणि साजिद खान-फराह खान यांच्यात चांगलीच जुंपली. आशूच्या ' जोधा अकबर 'ला मिळालेले तांत्रिक विभागाचे सगळेच पुरस्कार तो स्वत: घ्यायला आला. त्यावरून फराह-साजीदनं आशूला जाहीररित्या टोकलं. परिणामी सोहळ्यात जाहिररित्या खडाजंगी जुंपली. पुरस्कार सोहळ्यांमध्ये रुसवेफुगवे तर नेहमीचेच आहेत. पण यावेळी स्टार स्क्रीन पुरस्कार खरंतर जोधा अकबर या सिनेमाला याच सोहळ्यात पुरस्कार मिळाले होते, पण आशुतोष गोवारीकरवर या शोचा सूत्रसंचालक साजीद खानवर चांगलाच नाराज दिसला. थट्टामस्क री करणं ही तर साजीद खानची जुनी सवय. त्यामुळेच त्याला फारसं कोणी गांभीर्यानं घेत नाही . 'कहने में क्या हर्ज है' असाच त्याचा तोराअसतो. पण स्टार-स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात याच मस्करीची झाली कुस्करी आणि आशुतोष गोवारीकर चांगलाच दुखावला गेला.एकतर बॉलिवुडमध्ये सलग तीन सुपरहिट सिनेमे दिल्यानंतरही आशुतोष गोवारीकर कधीच गॉसिपमध्ये नसतो. अभ्यासू आणि विचारी दिग्दर्शक अशीच त्याची ख्याती आहे. आता अशा माणसाला दुखवू नये हे साजिदलाही कळायला हवं होतं. अर्थात साजीदला यात काही वावगं वाटलं नाहीच.उलट बहीण फराह खान सुध्दा त्याच्या मदतीला आली. स्टार-स्क्रीन पुरस्कार सोहळा होत असल्याचं आशूनं मुद्दाम रेहमानला कळलं नसल्याचा आरोप फराहनं आशूवर जाहीररित्या केला. अक्षयकुमारसुध्दा याच सोहळ्यातून नाराज होऊन निघून गेला होता. कारण आमिर खानला पुरस्कार न मिळाल्यामुळं अक्षय कुमार दुखावला गेला. पुरस्कारापेक्षा हा सोहळा इतर गोष्टींमुळेच गाजला, असं दिसत आहे. स्टार - स्क्रीन पुरस्कार सोहळ्यातला आशू-साजीदचा वाद ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 20, 2009 02:17 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2009 02:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close