S M L

सानिया ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर

21 जानेवारी, ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसर्‍या फेरीत सानिया मिर्झाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. नादिया पेत्रोव्हाने तिचा दोन सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेतील सानियाचं आव्हान संपुष्टात आणलं. दुखापती आणि सुमार कामगिरीमुळे सानिया जागतिक क्रमवारित 100 च्या बाहेर फेकली गेली होती. आणि आता या पराभवामुळे तिच्यासमोरची आव्हानं जास्तच वाढली आहेत.एकीकडे स्पर्धेत अंडरडॉग समजली जाणारी सानिया आणि दुसरीकडे प्रतिस्पर्धी म्हणुन 10 वं सिडेड मिळालेली खेळाडू. पेत्रोव्हाने पहिल्या सेटमध्ये आपलं वर्चस्व गाजवलं आणि सेटमध्ये 4-1 अशी आघाडीही घेतली. त्यानंतर सानियाने नंतरचे दोन्ही गेम जिंकत आपल्या फॅन्सना दिलासा दिला. पण त्यानंतर पेत्रोव्हाने सानियाला कुठलीही संधी दिली नाही आणि या जबरदस्त बॅकहॅण्डच्या जोरावर तिने सेट 6-3ने आपल्या खिशात टाकला.सानिया जिंकण्यासाठी आतूर होती. आणि काही अप्रतिम शॉट मारत तिने हे सिद्धही केलं. तिने मारलेल्या या बॅकहॅण्डच्या जोरावर दुसर्‍या सेटमध्ये सानियाने आघाडी घेतली. जिंकण्यासाठी सानियाने सर्वाेतपरी प्रयत्न केले खरे पण नशिबानेही तिच्या बाजुने साथ दिली नाही. लवकरच पेत्रोव्हाने सानियाची सर्व्हिस तोडली आणि दुसर्‍या सेटमध्येही 5-2 अशी आघाडी घेतली. यानंतर विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यास पेत्रोव्हानं फार वेळ घेतला नाही. पेत्रोव्हाने मॅच 6-3, 6-2 अशी आपल्या नावावर केली. पॉइंट टेबल जरी पेत्रोव्हासाठी सोपा विजय दाखवत असले तरी सानियाने मॅचमध्ये तिला चांगली फाईट दिली आणि दुखापतीतून सावरत असल्याचंही दाखवून दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2009 08:49 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2009 08:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close