S M L

दुसर्‍या फेरीत फेडररचा सहज विजय

21 जानेवारी, ऑस्ट्रेलियाजागतिक क्रमवारित दुसर्‍या स्थानावर असलेल्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनच्य दुसर्‍या फेरीत सहज विजय मिळवला. तीन वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकवणार्‍या रॉजर फेडररने रशियाच्या कोरोलेव्हचा तीन सेटमध्ये पराभव करत तिसर्‍या राउंडमध्ये प्रवेश केला. फेडररने 6-2, 6-3, 6-1 असा सहज विजय मिळवला. आता तिसर्‍या फेरीत त्याचा मुकाबला मरात साफिनशी होईल.गतविजेत्या सर्बियाच्या नोव्हॅक जॉकोविचनंही ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. त्याने फ्रान्सच्या जेरेमी चार्डीचा 7-5, 6-1, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर असलेल्या जॉकोविचला चार्डीने पहिल्या सेटमध्ये टफ फाईट दिली पण जॉकोविचने सेट 7-5 असा खिशात टाकला. त्यानंतर मात्र त्याने चार्डीला कुठलीही संधी दिली नाही. पुढचे दोन्ही सेट आरामात जिंकत जोकोविचनं पुढच्या फेरीत प्रवेश केला.महिलांमध्ये पाचवं सीड मिळालेल्या ऍना इव्हानोव्हिकला दुसर्‍या फेरीत विजय मिळवण्यासाठी जास्त झगडावं लागलं नाही. तिने अल्बेर्टा ब्रिटनीला मॅचमध्ये एकही संधी दिली नाही आणि 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवत तिसर्‍या फेरीत प्रवेश केलाक्रोएशियाच्या मारीन किलीचने सार्बियाच्या जॅन्को तिपसारेव्हीकचा 6-2, 6-3, 4-6, 6-3 असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. 20 वर्षीय किलीचने पहिले दोन सेट आरामात जिंकले. तिसर्‍या सेटमध्ये तिपसारेव्हीकने किलीचची सर्व्हिस ब्रेक करत मॅचमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. पण चौथ्या सेटमध्ये मात्र किलीचने एकही संधी गमावली नाही आणि तिसर्‍या फेरीत प्रवेश केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2009 06:07 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2009 06:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close