S M L

इंटर काँटिनेन्टल हॉटेलमध्ये शिवसैनिकांची तोडफोड

21 जानेवारी, मुंबईमुंबईतल्या इंटर काँटिनेन्टल हॉटेलमध्ये शिवसैनिकांनी तोडफोड केली. कामगारांना कामावरून कमी केल्याच्या कारणावरून ही तोडफोड शिवसैनिकांनी केली आहे. ' जोपर्यंत कामावरून कमी कलेल्या कर्मचा-यांना परत घेतलं जाणार नाही तोपर्यंत शिवसैनिकांचं हे आंदोलन सुरू राहील, ' असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. त्यासंदर्भात इंटर काँटिनेन्टलचे मालक ललित सुरी याच्या पत्नीचं खासदार संजय राऊत यांच्याशी बोलणं झालं आहे. ललित सुरींच्या पत्नीनं संजय राऊत यांची माफी मागितली आहे. कामावरून कमी केलेल्या कर्मचा-यांना दोन - तीन दिवसांत कामावर परत घेतलं जाईल, असं आश्वासन त्यांनी संजय राऊत यांना दिलंय.या आंदोलनाविषयी भारतीय कामागार सेनेचे नेते सूर्यकांत महाडिक म्हणाले, " ' आम्ही इंटर काँटिनेन्टलवर सेनेचा भगवा फडकू देणार नाही, असं आव्हान इंटर काँटिनेन्टलच्या व्यवस्थापनानं केलंय. खरं तर शिवसेना प्रमुखांनीच इंटर काँटिनेन्टल हॉटेल बांधण्यासाठी मदत केली आहे. मात्र हे मॅनेजमेंट विसरलंय. जेव्हा हॉटेल बांधून झालं तेव्हा आम्ही स्थानिक नागरिकांना कामावर घेऊ असा शब्द हॉटेलच्या मालकांनी शिवसेनाप्रमुखांना दिला होता. पण तो पाळला गेला नाही. हॉटेलनं सहा महिन्यांपूर्वीच ज्या 21 कर्मचा-यांना कामावरून काढलं आहे. त्यांना कामावर रूजू करून घेण्यास हॉटेल प्रशासनाची टोलवा टोलवीची भूमिका दिसून आली.त्यासंदर्भात बोलण्यासाठी आम्ही तिथे गेलो होते. पण हॉटेलच्या कर्मचा-यांनी हॉटेलचं दार उघडलं नाही. त्यामुळे आम्हाला तोडफोडीचा मार्ग अवलंबवावा लागला. हॉटेलच्या प्रशासनानं सहकार्य केलं असतं तर बोलणी शांतपणेही झाली असती." हा तोडफोडीचा प्रकार पाहता हॉटेलमध्ये उतरलेले पाहुणे आपापल्या खोल्यांतून बाहेर पडलेले नाहीत. इंटर काँटिनेन्टलच्या तोडफोडीबाबत पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतलं आहे. ' जोपर्यंत हॉटेल मॅनेजमेंट आमच्याशी बोलायला येत नाही. तोपर्यंत आम्ही हॉटेलमध्येच थांबणार आहोत. आणि आंदोलनाचं स्वरूप तीव्र करणार आहोत, ' असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2009 08:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2009 08:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close