S M L

साध्वी निर्दोष असल्याचा तिच्या वडिलांचा दावा

21 जानेवारी, मुंबई मालेगावं बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतल्या मोक्का कोर्टात 11 जणांन विरोधात 4500 पानांचं आरोपपत्र दाख करण्यात आलं. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरच्या वडीलांनी मात्र आपली मुलगी निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्ताननं मालेगाव ब्लास्टबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल राज्य आणि केंद्र सरकार दोषी असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच शहीद हेमंत करकरे यांच्या नसण्यानं या खटल्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं."प्रज्ञाला ज्या प्रकरणात दोषी ठरवलं गेलं आहे. त्यात सापडलेली गाडी प्रज्ञाची आहे. तिची चुक एवढीच की गाडी विकल्यावर ती खरेदीदाराच्या नावावर ट्रान्सफर केली गेली नाही. एक खोटं 100 वेळा सांगितल्यावर ते सत्य होत नाही. प्रज्ञाचं निर्दोषत्व लवकरच समोर येईल" असं प्रज्ञा सिंगचे वडील चंद्रपाल सिंह म्हणाले.दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर बुधवारी होणारी सुनावणी मंुबई सेशन कोर्टानं एक दिवस पुढे ढकलली आहे. या सुनावणीत आरोपींना मोक्का लागेल किंवा नाही हे स्पष्ट होईल. त्यानंतर या खटल्याच्या सुनावणीला रितसर सुरुवात होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2009 12:44 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2009 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close