S M L

'जयंत पाटील राजारामबापू कारखान्याचा ताबा सोडा'

Sachin Salve | Updated On: Jul 16, 2013 05:33 PM IST

Image img_31512_jayant_patil_final_240x180.jpg16 जुलै : ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्यानं सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचा ताबा येत्या 10 दिवसांत सोडावा, असा आदेश साखर आयुक्तांनी नेमलेल्या लवादाने दिलाय. सांगली जिल्ह्यातल्या कादरवाडीत भाजपचे आमदार संभाजी पवार यांचा सर्वोदय सहकारी साखर कारखाना जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याने चालवण्यासाठी आपल्या ताब्यात घेतला होता.

 

आर्थिक देवघेवीच्या कारणावरुन हा कारखाना परत देण्यास राजारामबापू कारखान्याने नकार दिला होता. त्यामुळे याबाबत साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर साखर लवादानं सर्वोदय कारखान्याने 42 कोटीची रक्कम आणि त्यावरचं 12 टक्के व्याज राजारामबापू कारखान्याला द्यावे आणि दहा दिवसात सर्वोदय कारखान्याचा ताब्याचा राजारामबापू कारखान्याने सोडावा असा आदेश देण्यात आलाय. या निर्णयाची माहिती पवार यांना कळताच सांगलीत जल्लोष करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2013 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close