S M L

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी बी.एल. शर्मा महत्त्वाचे साक्षीदार

22 जानेवारी, मुंबई मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तापसाला वेगळच वळण मिळालं आहे. सैन्यातील अधिकारी आणि काही साधूंनी मालेगावचा बॉम्बस्फोट घडवून आणला, हे सर्वांना ठावूक आहे. पण आता सैन्यातील अधिकारी आणि साधूंबरोबरीनं बी.एल. शर्मा सारख्या राजकीय नेत्यांची नावं ही मालेगाव स्फोटाशी जोडली गेली आहेत. या नेत्यांची काय भूमिका होती यावर एटीएसनं दाखल केलेल्या आरोपपत्रात खुलासा करण्यात आला आहे. बी. एल. शर्मा हे भाजपचे पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून दोनदा खासदार पदासाठी निवडून आलेले आहेत. ते विश्व हिंदू परिषदेचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस होते. तर 1940पासून आरएसएसचे सक्रीय सभासदही होते. बी.एल. शर्मा तीनवेळा अभिनव भारत या संघटनेच्या बैठकांना हजर होते. दिल्लीत त्यांची भेट एकदा दयानंद पांडे उर्फ शंकराचार्य स्वामी अमृतानंद याच्याशी झाली. दयानंद पांडेनं त्यांना काही व्हिडीयो क्लीप दाखवल्या. त्यात हिंदूंवर मुस्लिमांकडून झालेल्या कथित अत्याचाराची दृश्य होती. ही व्हिडिओ फिल्म पाहून शर्मा हे दयानंद पांडेंच्या अधिक संपर्कात आले. त्यांनंतर 2007मध्ये महाराष्ट्रात नाशिक जवळच्या देवळाली इथं एका बैठकीला बी एल शर्मा हजर होते. त्या बैठकीला लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, दयानंद पांडे, सुधाकर चतुर्वेदी हेही हजर होते. आर्यावर्त म्हणजे हिंदू राष्ट्रीय उभारणीवर या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर याच विषयावर दुसरी बैठक दिल्लीजवळच्या फरिदाबाद इथं झाली. तो दिवस होता 26 जानेवारी 2008.भारताचा प्रजासत्ताक दिन. त्या दिवशी झालेल्या बैठकीत हिंदू राष्ट्राची घटनेचा मसुदा दयानंद पांडेनं वाचून दाखवला.त्यावेळी बीएल शर्मा हजर होते. एटीएसनं बी एल शर्मा यांचाही जाबजबाब घेतलाय. 27 नोव्हेंबर 2007 रोजी एक बैठक झाली त्याचा व्हिडीओ एटीएसच्या ताब्यात आहे. त्यात बी एल शर्मा दिसताहेत. अखंड भारताची कल्पना सावरकर यांनी उचलली. पण जनसंघ आणि भाजपनं तो मुद्दा सोडून दिला अशी खंत या बैठकीत बी एल शर्मा यांनी व्यक्त केलीये. याच भाजपच्या माजी खासदार बी.एस. शर्मांना एटीएसनं मालेगाव बॉम्बस्फोटातील एक साक्षीदार बनवलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2009 05:21 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2009 05:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close