S M L

राज्यात 13 लाख चिमुरड्यांना कुपोषणाचा विळखा

Sachin Salve | Updated On: Jul 17, 2013 04:18 PM IST

Image img_176932_kuposhan_240x180.jpg17 जुलै : महाराष्ट्र राज्यात एकूण 64 लाख लहान बालकांपैकी एकूण 13 लाख लहान मुलं कुपोषणाच्या विळख्यात आहेत. त्यातली 4 लाख लहान मुलं एसएएम (SAM) म्हणजेच सिव्हिअर ऍक्युट आणि एमएएम (MAM) म्हणजे मिडिअम ऍक्युट मालन्युट्रीशन या वर्गवारीमध्ये आहेत. राज्याच्या आरोग्य सचिवांनीच ही आकडेवारी जाहीर केलीय.

त काम करणार्‍या खोज या संस्थेच्या सदस्या पूर्णिमा उपाध्याय यांनी 9 जुलैला मुंबई हायकोर्टात या संदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारतर्फे जे शपथ पत्र दाखल करण्यात आलं. त्यात असं सांगण्यात आलं की, राज्यात 13 लाख मुलं आजही कुपोषणाच्या विळख्यात आहेत. राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये सुसंवादाचा आभाव आहे आणि याच कारणामुळे कुपोषणाची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चाललीय. राजमाता जिजाऊ मिशनमध्ये चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून लक्षच देण्यात आलेलं नाही असे आरोप पूर्णिमा उपाध्याय यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2013 02:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close