S M L

आठ कोटी प्रकरणी मुंडेंनी मागितली 4 आठवड्यांची मुदत

Sachin Salve | Updated On: Jul 17, 2013 04:43 PM IST

Image munde45_300x255.jpg17 जुलै : मागील लोकसभेच्या निवडणुकीला मी आठ कोटी रूपये खर्च केले कुणाला काय तक्रार करायची ती करा अशी जाहीर कबुली देणारे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली आहे. मुंडेंच्या सत्य वचनामुळे विरोधकांनी टीका केली होती आणि निवडणूक आयोगानेही मुंडेंच्या विधानाची दखल घेत नोटीस बजावली होती.

गोपीनाथ मुंडे भाजपचे जेष्ठ नेते...गुजरात मुख्यमंत्री आणि प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुंडेंनी गेल्या निवडणुकीत आठ कोटी रूपये खर्च केल्याची जाहीर कबुली दिली आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी हीच संधीसाधत मुंडेंची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणीच केली तर त्यांच्या विधानाची दखल घेत निवडणूक आयोगाने मुंडेंना नोटीस पाठवली. नियमांप्रमाणे कोणताही उमेदवार 40 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे प्रचारासाठी खर्च करू शकत नाही. पण मुंडेंनी स्वतःच नियम तोडल्याचं मान्य केल्यामुळे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2013 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close