S M L

जागेच्या राजकारणावरून काँग्रेस, शिवसेनेत जुंपली

22 जानेवारी मुंबईशिववडा विरोधात कांदेपोहे अशी स्पर्धा सद्या सुरू झाली आहे. शिवसेनेच्या शिववड्याला जर मुंबईत पालिकेचे स्टॉल मिळणार असतील तर कांदेपोह्यालाही स्टॉल मिळावेत अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनाही आता आमचा कांदेपोह्यांना विरोध नाही असं म्हणतंय.25 नोव्हेंबर 2008ला शिवसेनेनं शिवाजीपार्कवर गाजा वाजा करत शिववडा सुरू करत असल्याची घोषणा केली. त्याला उत्तर म्हणून काँग्रेसनेही कांदेपोहे विकण्याची घोषणा केली. पण यानंतर सुरू झाली पालिकेचे स्टॉल मिळवण्यासाठी स्पर्धा. शिववड्यासाठी 8बाय 4चे स्टॉल मिळावेत अशी मागणी शिवसेनेनं केली.त्यापाठोपाठ आता कॉंग्रेसही उतरलं. याबाबत काँग्रेसचे नगरसेवक समीर देसाई सांगतात, त्यांना जर महापालिका स्टॉल देणार असेल तर आम्हाला पण द्यायला पाहिजे. यावर स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र वायकर सांगतात,आमच्या शिववड्याच्या स्टॉलवर आम्ही कांदेपोहेपण विकू पण काँग्रेसकडून ही सूचना उशीरा केली गेली.शिवसेनेनं शिववडा लॉंच करायचं घोषित केल्यानंतर काँग्रेसने लगेचच कांदेपोहे सुरू करण्याची घोषणा केली.पण आता शिवसेना म्हणत आहे आम्हीपण कांदेपोहे विकू एक प्रकारे सेनेनं काँग्रेसच्या संकल्पनेवर डल्ला मारला आहे. यापूर्वी मुंबईतील रिकाम्या जागांवर स्टॉल आले ते झुणका भाकर केंद्रांच्या नावानं. नाव होतं मराठी माणसाचं.आता बहुतेक स्टॉल चालवत आहेत परप्रांतीय.शिववडा आणि कांदेपोह्याचेही आता स्टॉल्स येतील.जमीन जाईल महापालिकेची.मुंबई शहराची. मात्र राजकीय मुखवट्या आड व्यापार सुरू राहिल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2009 06:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2009 06:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close