S M L

'विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा'

Sachin Salve | Updated On: Jul 22, 2013 03:03 PM IST

Image img_234952_vidhanbhava_240x180.jpg22 जुलै : मुसळधार पावसामुळे विदर्भात शेतीचं हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 25 हजार रूपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत केली. पण पावसामुळे वाहून गेलेल्या शेतीलाच हेक्टरी 25 हजार रूपयांची मदत करण्याचं आश्वासन मदत व पूनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी दिलं. पण यावर विरोधकांचं मात्र समाधान झालं नाही. पूर्व विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यमुळे आधी चार वेळा आणि नंतर दिवसभरासाठी विधानसभा तहकूब करण्यात आली.

विदर्भाला गेल्या आठवड्यापासून पावसानं चांगलंच झोडपलं. आता पावसानं जरा उसंत घेतली असली तरी गेल्या दोन दिवसात मोठं नुकसान झालंय. यवतमाळ जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा फटका बसलाय. जिल्ह्यातल्या पैनगंगा, आडनखुनी, अरुणावती या नद्यांना पूर आलाय. त्यात बाराशेहून जास्त घरं वाहून गेली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबं उघड्यावर आली आहेत. एका महिन्यात अरुणावती नदीला दुसर्‍यांदा पूर आला. यावेळेस अरुणावतीने चांगलेच रौद्र रुपधारण केल होतं. घरं वाहून गेलेली कुटुंब सरकारकडे मदतीची याचना करत आहेत.

चंद्रपुरला पावसाचा तडाखा

मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे चंद्रपूर शहराचं मोठं नुकसान झालंय. चाळीस हजार हेक्टरवरचा कापूस, सोयाबीन आणि धानाला फटका बसलाय. राजूरा, कोरपना, गोंडपिपरी, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, ब्रह्मपुुरी या तालुक्यामंध्ये प्रचंड नुकसान झालंय. शहरातल्या एक हजार घरांची पडझड झालीय. त्यात झोपडपट्टी आणि नाल्यावरच्या घरांना सर्वाधिक फटका बसलाय. चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलीया यांनी महापौर संगीता अमृतकर आणि महापालिकेच्या पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन शहराची पाहणी केली आणि मुख्यमंत्र्यांना तातडीनं फॅक्स पाठवून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडं केली.

 

तिसर्‍या दिवशीही रेल्वे वाहतूक बंदच

वर्ध्यातल्या सिंदीमध्ये रेल्वे ट्रक खालचा भराव वाहून गेल्यानं आज तिसर्‍या दिवशीही रेल्वे वाहतूक बंदच आहे. वर्धा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नागपूर-मुंबई रेल्वे मार्ग पूर्णपणे बंद पडलाय. पावसामुळे 350 मीटरचा भाग पूर्णपणे वाहून गेलाय. तर 10 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय 71 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2013 03:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close