S M L

अखेर नाईकांनीच ग्लास हाऊसवर चालवला हातोडा

Sachin Salve | Updated On: Jul 22, 2013 10:13 PM IST

ganesh naik22 जुलै : उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांचं नवी मुंबईतील ग्लास हाऊस अखेर तोडायला सुरूवात झाली आहे. आज सकाळपासून गणेश नाईक यांच्या कुटुंबीयांनी स्वत:हून हे ग्लास हाऊस तोडायला सुरूवात केली आहे. नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये हे ग्लास हाऊस आहे. महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून हे ग्लास हाऊस बांधण्यात आलं होतं. त्यामुळे हायकोर्टाने हे ग्लास हाऊस तोडण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी 20 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने नवी मुंबई महापालिकेनं हे ग्लास हाऊस तोडावं, असे आदेश हायकोर्टाने दिले होते. दिलेल्या मुदतीत हे ग्लास हाऊस तोडलं गेलं नाही. मात्र आता खुद्द नाईक कुटुंबीयांनी हातात हातोडा घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2013 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close