S M L

मावा,खर्रा आणि सुगंधी तंबाखूवर बंदी

Sachin Salve | Updated On: Jul 22, 2013 05:48 PM IST

मावा,खर्रा आणि सुगंधी तंबाखूवर बंदी

mava guthkaha22 जुलै : राज्यात गुटखा आणि पानमसाल्यानंतर आता सर्वच प्रकारच्या सुगंधी तंबाखूवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय. गुटखा, पानमसाला यांच्यावरच यापुर्वीच सरकारनं बंदी घातली होती. त्यापाठोपाठ आता मावा, खर्रा, खैनी, आणि सुगंधी जर्दा या पदार्थांच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आलीय. गेल्या 18 जुलैला याबाबतची अधिसूचना सरकार काढलीय. 19 जुलैपासून ही बंदी लागू झाल्याचं त्यांनी सांगितलं. पण साध्या तंबाखूवर बंदी नसल्याचंही सतेज पाटील यांनी सांगितलं आहे.

मागील वर्षी संपूर्ण राज्यात गुटखाबंदी करण्यात आली. गुटखा बंदीच्या निर्णयात देशात महाराष्ट्र राज्य हे तिसरे राज्य ठरले. 2011 साली अन्न औषध प्रशासनाने वर्षभरात 1173 पानमसाला आणि गुटख्यांचे नमुने तपासले त्यापैकी 853 नमुन्यांमध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट मोठ्या प्रमाणात आढळले होते. त्यामुळे सार्वजनिक हितासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्यामुळे गुटखाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. ही बंदी एक वर्षासाठी करण्यात आली होती. मात्र याही वर्षी गुटखा बंदीचा कालावधी आणखी वर्षभरासाठी वाढवण्यात आला आहे. आता त्यापाठोपाठ मावा, खर्रा, खैनी, आणि सुगंधी जर्दावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. मात्र गेल्या वर्षभरात राज्य सरकारच्या आदेशाला धाब्यावर बसवून सर्रास गुटखा विक्री सुरूच आहे. गुटखा बंदी जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी कारवाई झाल्या पण नंतर सर्व काही शांत झालं. त्यामुळे सरकारने बंदीसोबतच निर्मितीवरही बंदी घालावी अशी मागणी होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2013 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close