S M L

मनमोहन सिंग यांचा वारसादार कोण ?

24 जानेवारी, दिल्लीपंतप्रधान मनमोहन सिंग आता यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात भाग घेऊ शकणार नाहीत. संसदेच्या सत्रातही ते उपस्थित राहू शकणार नाहीत. इतकंच नव्हे तर येत्या निवडणुकीत काँग्रेससाठी प्रचार करणंही पंतप्रधानांसाठी अशक्य दिसतंय. पंतप्रधानांच्या आजारपणामुळे राजकीय आघाडीवर काय घडेल त्याचा हा आढावा. मनमोहन सिंग यांचं आजारपण काँग्रेससाठी अडचणीच्या काळात आलं आहे. आर्थिक मंदी, दहशतवादाविरोधातला लढा, आणि महत्त्वाचं म्हणजे लोकसभेची निवडणूक तोंडावर आलीय. मनमोहन सिंग यांच्या आजारपणामुळे आता लक्ष आहे प्रणव मुखर्जी यांच्याकडे. काँग्रेस पक्ष आणि युपीए सरकारमध्ये मुखर्जी यांचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. आता पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत सरकारचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. "जेव्हा पंतप्रधान उपस्थित नसतात, त्यावेळी सर्वात ज्येष्ठ मंत्र्यांनी कामकाज सांभाळावं, ही परंपराच आहे. मी सुद्धा त्याच परंपरेचं पालन करणार आहे" असं प्रणव मुखर्जी यांनी स्पष्ट केलं आहे.प्रणव मुखर्जी आता पंतप्रधानांच्या अखत्यारित असलेली सर्व खाती सांभाळतील. पण ही स्टॉप गॅप अरेंजमेंट असणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. निवडणुकीनंतर मनमोहन सिंग यांच्या जागी प्रणव मुखर्जी येतील. किंवा सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रं सोपवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पाच वर्षांपूर्वी मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदासाठी सोनिया गांधी यांनी निवड केली. त्याचं कारण होतं मनमोहन सिंगांची गांधी घराण्यावरची निष्ठा. 2009 च्या निवडणुकीतही निष्ठेचा फॅक्टरच प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. जोपर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत, तोपर्यंत निष्ठा हीच महत्त्वाची ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2009 08:06 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2009 08:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close