S M L

शहीद शशांक शिंदे यांच्या कुटुंबियांच्या आरोपांवर राजकीय नेते गप्प

24 जानेवारी, मुंबईमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांपैकी चौघांना अशोकचक्र पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं. मात्र याच हल्ल्यात सीएसटी स्टेशनवर दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस अधिकारी शशांक शिंदे यांना अशोकचक्र पुरस्कार न दिल्याबद्दल त्यांच्या पत्नी मानसी शिंदे यांनी निषेध व्यक्त केला आहे. या वेळी त्यांनी राज्यकर्त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर राजकीय नेत्यांकडे कोणतीही उत्तरं नाही. दुर्देवानं महाराष्ट्राचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी यासंदर्भात कोणतंही उत्तर दिलेलं नाही."गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि कित्येक राजकीय नेते सांत्वनासाठी सगळ्या शहिदांच्या कुटुंबियांना भेटले. ते सगळं मीडियावर दाखवलं गेलं. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की शस्त्रास्त्र, गोळ्या, बुलेटप्रुफ जॅकिट्स पुरवली जातील. भविष्यात अशी हलगर्जी होणार नाही. पण आज जेव्हा अशोक चक्र देताना शशांक शिंदे यांना वगळण्यात आलं, तेव्हा त्यांनी याबद्दल केंद्र शासनाला प्रश्न का विचारले नाहीत ? आतात ते आपली जबाबदारी का झटकत आहेत ?" असा सवाल शहीद शशांक शिंदे यांची मुलगी आदिती शिंदे हिने विचारला.यावर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं उत्तर नेहमीचच होतं. "आम्ही शहीद शशांक शिंदे यांचं नाव शौर्य पुरस्कारासाठी सुचवलं होतं, मात्र केंद्राकडून ते नाकरलं गेलं. याबद्दल कोणतही स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलेलं नाही. मी आता याबद्दल अधिक माहिती घेईन" असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं.माजी आयपीएस अधिकारी वाय. पी सिंग यांनीही शौर्यपदकं देताना राजकारण झालं असल्याच्या शक्यतेला दुजोरा दिला आहे. "शौर्‍यपदकं देताना कायमच राजकारण होतं. ज्यांचं नाव लोकांना माहीत होतं, मीडियातून पुढे आलं, त्यांना शौर्यपदकं दिली गेली. आम्ही किती चांगलं काम करतोय, हे लोकांना दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. खरं तर, शिंदे यांची कामगिरी खरोखर महान आहे, पण लोकांपर्यंत ते फारसं पोहोचलेलं नाही. त्यामुळे शहीद शशांक शिंदे यांना डावललं गेलं असावं. जर केंद्र सरकारनं महाराष्ट्र शासनानं शहीद शशांक शिंदे यांच्या नावाची शिफारस केली होती, जर केंद्रानं ते डावललं असेल तर राज्यानं त्याचं स्पष्टीकरण मागायला हवं." असं वाय. पी सिंग. यांनी सांगितलं.भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी या प्रश्नावर राज्य सरकार तसंच महाराष्ट्र पोलीस दलाच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना जबाबदार धरलं. "मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व अधिकार्‍यांना शौर्यपदक मिळावं अशी आम्ही मागणी केली आहे. आमची ही भूमिका आम्ही शासनासमोर मांडली आहे. मात्र महाराष्ट्र पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी यासंदर्भात गलिच्छ राजकारण केलं आहे. त्याची परिणिती शहीद शशांक शिंदे यांना पुरस्कार न मिळण्यात झालं आहे." असं माधव भंडारी यानी सांगितलं.या प्रकरणाचं राजकारण करू नये असं संजय अभिनेते संजय नार्वेकर यानी सांगितलं. "शासनाची चूक झाली आहे, त्याची दखल घेतली जावी, पण राजकारण करू नये. हा राजकारणाचा विषय नाही. ताबडतोब चूक सुधारली जावी." अशी प्रतिक्रिया संजय नार्वेकर यांनी दिली.या विषयावर मत व्यक्त करताना विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी राज्यसरकार आणि पोलीस प्रशासनाला दोषी ठरवलं. "हा सगळा राज्य सरकारचा गलथानपणा आहे. पोलीस महानिरीक्षक अनामी रॉय यांनी या प्रकरणावर राजकारण केलं आहे" असा आरोप त्यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2009 04:14 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2009 04:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close