S M L

काँग्रेस कार्यकर्त्यांची दादागिरी, हॉटेल पाडलं बंद

Sachin Salve | Updated On: Jul 23, 2013 05:09 PM IST

काँग्रेस कार्यकर्त्यांची दादागिरी, हॉटेल पाडलं बंद

aditya restorant23 जुलै : केंद्रातल्या यूपीए सरकार विरोधात हॉटेल बिलाच्या पावतीवर टिप्पणी केल्यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परळचं अदिती रेस्टॉरंट बंद पाडलं. ही घटना सोमवारी दुपारी घडली होती. गणेश कुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या 30 ते 35 कार्यकर्त्यांनी आंदोलन करत हे हॉटेल बंद करायला लावलं.

 

 

 

 

त्यामध्ये काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकरही सहभागी झाले होते. यूपीए सरकारच्या धोरणानुसार 2 जी, कोळसा, कॉमनवेल्थ या सारख्या घोटाळ्यांमध्ये पैसे खाणं ही गरज आहे. तर हॉटेलच्या एसी रूममध्ये बसून जेवणं ही चैन आहे. असा मजकूर या अदिती हॉटेलच्या मालकानं बिलाच्या पावतीवर छापलाय. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलच बंद पाडलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2013 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close