S M L

पुणे महापालिकेचा भूखंड घोटाळा

24 जानेवारी पुणेमुंबई महापालिका अधिनियमानुसार नगरसेवकाला किंवा त्याच्या नातेवाईकाला महापालिकेशी संबंधित व्यवहारात भाग घेता येत नाही. पण पुणे महापालिका याला अपवाद असल्याचं चित्र आहे. पुण्यातील मेधा कुलकर्णी या नगरसेविकेला महापालिकेच्या तीन जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा सुराज्य संघर्ष समितीच्या विजय कुंभार यांनी केला आहे. मेधा कुलकर्णी यांनी मात्र या आरोपाचं खंडन केलंय. पुण्यातील एरंडवणे इथल्या जागेवर सध्या व्यायामशाळा बांधण्यात आली आहे. या जागेची मालकी पालिकेकडे आहे. गेल्यावर्षी टेंडर भरणा-या मेधा कुलकर्णी यांच्या अस्मिता प्रतिष्ठान या संस्थेला हे कंत्राट मिळालं होतं. पण टेंडर भरणा-या इतर तिघांसोबत अस्मिता प्रतिष्ठानही यातून माघार घेतल्यानं ही मिळकत पाचवे टेंडर भरणा-या मेधा कुलकर्णी यांच्या पतीला देण्यात आलं. हे काम नियमबाह्य असल्याचं विजय कुंभार यांच म्हणणं आहे. या जागेसाठी दरवर्षी 12 टक्के भाडेवाढ करण्याची अटही आता काढून टाकण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर दुसरकडे मेधा कुलकर्णी यांनी या जागेचं भाडंही दिलं नसल्याचं उघड झालं आहे. महापालिकेच्या मिळकती भाड्यानं देण्याबाबत नगरसेवक किंवा त्यांच्या नातलगांना देण्याविषयी कोणताही कायदा नसल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. तसंच कुंभार यांनी कायद्याचा नीट अभ्यास करावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आता कुंभार यांनी महापौर आणि आयुक्तांना याबाबत पत्र दिलं आहे. पण अशाप्रकारे नियम धाब्यावर बसवून कामं करणा-या पालिकेविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय कुंभार यांनी घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2009 10:11 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2009 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close