S M L

पाचही आमदारांचं निलंबन रद्द

Sachin Salve | Updated On: Jul 24, 2013 03:48 PM IST

Image img_233502_mlahitpoliceinvidhanbhavan_240x180.jpg24 जुलै : विधानभवनाच्या आवारात एपीआय सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणातल्या पाचही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. त्याचसोबत सूर्यवंशी यांचंही निलंबन रद्द करण्यात आलंय. संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेत याबाबतचा ठराव मांडला. या ठरावाला सभागृहाने एकमुखाने मंजुरी दिली.

मनसेचे आमदार राम कदम, बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर, शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल, जयकुमार रावल, राजन साळवी यांचं निलंबन आता रद्द झालंय. दरम्यान, शिवसेनेचे आमदार ओमराजे निंबाळकर यांचही निलंबन मागे घ्यावं अशी मागणी विरोधकांनी केलीय. विदर्भातल्या दुष्काळच्या मुद्द्यावरून अध्यक्षांपुढचा राजदंड पळवल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

19 मार्च रोजी सचिन सूर्यवंशींना विधानसभेच्या आवारात मारहाण झाली होती. या प्रकरणी राम कदम, क्षितूज ठाकूर, प्रदीप जयस्वाल, जयकुमार रावल, राजन साळवी या पाच आमदारांना 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलं होतं. निलंबन झाल्यानंतर राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांनी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांना तीन दिवसांची तुरूंगाची हवा खावी लागली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2013 03:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close