S M L

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शैला लोहिया यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Jul 24, 2013 07:55 PM IST

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शैला लोहिया यांचं निधन

shaila lohiya24 जुलै : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शैला लोहिया यांचं वृद्धपकाळानं अंबाजोगाई इथं राहत्या घरी निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे सामाजिक कार्यकर्ते द्वारकादासजी लोहिया आणि दोन मुलं असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आंबाजोगाई इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मराठवाडा नवनिर्माण लोकायत म्हणजेच 'मानवलोक' या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजातल्या परितक्त्या, विधवा, अनाथ, महिला आणि मुलांसाठी मौलाचं काम केलंय. लातूरच्या किल्लारी भुकंपात लोहिया दाम्पत्याचं उल्लेखनीय कार्य आहे. साने गुरूजी यांच्या राष्ट्र सेवा दलापासून त्यांनी सामाजिक कार्याला सुरूवात केली. आंतरराष्ट्रीय परिषदांमधून विविध विषयांवर त्यांनी प्रबंध सादर केले आहेत. यात प्रामुख्यानं बिजिंग इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत त्यांनी भारताचं नेतृत्त्व केलं होतं. इं़डो-कॅनेडियन, काठमांडूची सार्क परिषद यासारख्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी महत्त्वाचा सहभाग घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2013 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close