S M L

मुंबईत पावसाला 'ब्रेक' मात्र लोकल मंदावली

Sachin Salve | Updated On: Jul 24, 2013 05:36 PM IST

मुंबईत पावसाला 'ब्रेक' मात्र लोकल मंदावली

rain mumbai 24 july24 जुलै : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं आज दुपारनंतर थोडी विश्रांती घेतलीय. मुंबईतल्या हार्बर लाईनवर सीएसटी ते वडाळादरम्यान पाणी साचल्यानं वाहतूक काही तास ठप्प होती. पण, आता वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू झालीय. तर सध्या मध्य रेल्वेवर कुठेही पाणी साचलं नसल्यामुळे लोकल गाड्या नियमित वेगाने धावत आहे.

पण, रस्ते वाहतुकीवर मात्र परिणाम झालाय. हिंदमाता परिसर, एलफिन्स्टन रोड पुलाजवळ पाणी साठलंय. सायन, परळ, लालबाग, मुलुंड आणि अंधेरीतल्या सखल भागांत पाणी साचलंय. पूर्व आणि पश्चिम उपनगर, तसंच नवी मुंबई आणि ठाणे परिसराला पावसाचा तडाखा बसलाय. ठाण्याकडून मुंबईकडे येणार्‍या रस्त्यावरच्या वाहतुकीची कोंडी झालीय. पावसामुळे ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. प्रवाशांना रिक्षा आणि टॅक्सी मिळण्यातही अडचणी येत आहेत.

अरबी समुद्रात भरती आली असून हाय टाईडचा इशारा देण्यात आलाय. जवळपास 4.98 मीटरची भरती येण्याची शक्यता आहे. पुढच्या 48 तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय. लोकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असं आवाहन महापालिका आणि पोलिसांनी केलंय. लहान मुलांना शाळेतून घरी घेऊन येण्याचं आवाहनही करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2013 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close