S M L

मुंबईत पाऊस ओसरला, लोकलसेवा सुरळीत

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2013 04:22 PM IST

mumbai maharashtra rain (36)25 जुलै : मुंबईत गेल्या दोन दिवसांनंतर पावसानं विश्रांती घेतलीये. आज तिन्ही मार्गावरची लोकलसेवा सुरळीत आहे. रस्तेवाहतूकही सुरळीत आहे. मात्र हवामान खात्याने येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. पण महापालिकेनं याबाबत कोणताही सुचना केली नाही. गेल्या दोन दिवसात मुंबईत बर्‍याच ठिकाणी पाऊस पडला, मात्र तो 10 मिमीपेक्षा कमीच होता. कुलाब्यात पावसाची नोंद 35.3 मिमी इतकी तर सांताक्रुझमध्ये 28.2 मिमी इतकी नोंद झाली. दिवसभरात शहर आणि उपनगरांमध्ये तुरळक तर एखाद-दुसर्‍या ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होईल असं वेधशाळेनं सांगितलं.

तर दुसरीकडे पावसाचा सगळ्यात मोठा फटका ठाणेकरांना बसलाय. मुंब्रा बायपास हा रस्ता पावसामुळे खचलाय. 2007 साली ऍटलान्टा या कंपनीनं हा रस्ता बांधला होता. या रस्त्यावरुन शिळफाटा, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई कडे अवजड वाहने येजा करतात. हा रस्ता तीन ठिकाणी खचला आहे. त्यातले एका ठिकाणचे काम होण्यासाठी जास्त कालावधी लागणार असल्याचं ऍटलान्टा कंपनीच्या व्यवस्थापकांनी स्पष्ट केलं आहे. हा रस्ता खचण्याचं मुख्य कारण त्याच्या आजुबाजूला होणार बांधकाम आहे तसेच त्या रस्त्याच्या बाजूला असलेली इतरही कामं व्यवस्थित पद्धतीनं होत नाही म्हणून हा रस्ता खचल्याचा आरोप कंपनीच्या व्यवस्थापकांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2013 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close