S M L

पद्म पुरस्कारांची यादी जाहीर

25 जानेवारी दिल्लीप्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं देण्यात येणा-या पद्म पुरस्कारांची यादी 'आयबीएन-लोकमत'च्या हाती आली आहे. या यादीत समावेश असलेली मान्यवरांची नावं देत आहोत. पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये प्रशासकीय सेवेतल्या डॉ. चंदि्रका प्रसाद श्रीवास्तव, सायन्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले डॉ. अनिल काकोडकर आणि व्यापार आणि उद्योगातले डॉ. ए. एस . गांगुली यांचा समावेश आहे. तर पद्मभूषण पुरस्कारांमध्ये कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात शमशाद बेगम, सामाजिक क्षेत्रात काम करणारे डॉ. नागनाथअण्णा नायकवडी आणि उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे अनिल मणिभाई नाईक यांचा समावेश आहे. पद्मश्री पुरस्कारानं अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, अक्षय कुमार, हेलन खान , वैद्यकीय क्षेत्रातले डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. बालस्वरुप चौबे, सामाजिक कार्याबद्दल जोसेफ एच. परेरा, उद्योजक आर. के. कृष्णकुमार, पं. हृदयनाथ मंगेशकर, कुमार सानू भट्टाचार्य पिनाझ मसानी, प्रकाश एन. दुबे, उदित नारायण, अमीन सयानी, आणि साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे लक्ष्मण बापू माने यांना गौरवलं जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2009 01:23 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2009 01:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close