S M L

सेनेचे आ.दिवाकर रावते 31 डिसेंबरपर्यंत निलंबित

Sachin Salve | Updated On: Jul 26, 2013 06:30 PM IST

divakar ravate26 जुलै : दोनच दिवसांपूर्वी एपीआय सूर्यवंशी मारहाण प्रकरणी पाच राडेबाज आमदारांचं निलंबन रद्द झालंय. या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांना निलंबित करण्यात आलं आहे. रावते यांनी विधानसभेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या दालनात असभ्य वर्तन केलंय. सभापतींच्या दालनात सिंचनाच्या मुद्दावर बैठक सुरू होती या बैठकीत रावतेंनी धिंगाणा घातला. त्यांच्या असभ्य वागण्यामुळे सभापतींनी रावते यांच्या निलंबनाची कारवाई केली. रावते यांना 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलंय.

विशेष म्हणजे सिंचनाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर चर्चा घडू शकत नाही असं असतानाही रावतेंनी सभापतींच्या दालनात धिंगाणा घातला.  सभापतींच्या दालनात रावतेंनी असभ्य वर्तन काय केलं याबद्दल आणखी तपशील मिळू शकला नाही.

तर आज सकाळी सिंचनाच्या मुद्यावरून विधानपरिषदेत विरोधकांनी सभात्याग केला. त्यामुळे सलग तिसर्‍या दिवशी विधान परिषदेत चर्चा होऊ शकलेली नाही. सिंचनाच्या मुद्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं , त्यावर चर्चा करता येणार नाही, अशी भूमिका सरकारनं घेतली. सिंचनाच्या प्रश्नावरून विधानपरिषदेमध्ये सरकार चर्चेसाठी टाळाटाळ करतंय, असा आरोप विरोधकांनी केलाय.

रावतेंची प्रतिक्रिया

ज्या वेळा सरकारकडे बहुमत असतं त्यावेळा आम्ही काहीही करू शकतो. तुम्ही कितीही ओरडा,काहीही करा आम्हाला जनतेनं निवडून दिलंय. 'हम करे सो कायदा' अशी जी प्रवृत्ती आहे ती हुकूमशाही प्रवृत्तीचं सरकार आहे असं माझ मत झालं आहे.- दिवाकर रावते

विनोद तावडेंची प्रतिक्रिया

रावतेंनी कोणताही गोंधळ घातला नाही. जर आम्ही गोंधळ घालत आहोत तर आम्हा सर्वांना निलंबित करा अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2013 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close