S M L

मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग

Sachin Salve | Updated On: Jul 27, 2013 03:18 PM IST

nagar rape27 जुलै : पुरोगामी महाराष्ट्राच्या राजधानी मुंब‍ईत आज सकाळी एक धक्कादायक घटना घडलीय. धावत्या लोकलमध्ये एका मुलीचा विनयभंग करण्यात आला. महालक्ष्मीहून माटुंग्याला जाण्यासाठी सकाळी 5.41 ची लोकल या मुलीनं पकडली. ट्रेन सुरू झाल्यावर दारू प्यायलेला एक माणूस महिलांच्या डब्यात चढला. आणि त्यानं मुलीची छेड काढायला सुरुवात केली. तसंच तिच्यावर बलात्कार करण्याचा आणि तिला धावत्या ट्रेनमधून ढकलून देण्याचाही प्रयत्न केला. पण मुलीनं कशीबशी आपली सुटका करून घेतली. आणि प्लॅटफॉर्मवर येऊन आरडाओरडा केला. त्यानंतर इतर प्रवाशांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. यावेळी ड्युटीवर हजर असलेला पोलीस कॉन्स्टेबल महिलांच्या डब्यात नव्हता. आता याप्रकरणी मुंबई सेंट्रल पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. पीडित मुलगी एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. या घटनेमुळे लोकलमधल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2013 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close