S M L

'शिवाजी अंडरग्राऊंड'ला हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध

Sachin Salve | Updated On: Jul 28, 2013 12:47 AM IST

'शिवाजी अंडरग्राऊंड'ला   हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध

SHIVAJI PLAY PROTES4.t27जुलै : 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या लोकप्रिय नाटकाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलाय. नाशिकच्या कालिदास कला मंदिरमध्ये आज शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शनं केली.

हे नाटक धर्म विरोधी असल्यामुळे ते बंद करावं अशी मागणी ह्या संघटनांनी केली. विशेष म्हणजे ह्या कार्यकर्त्यांपैकी एकानेही हे नाटक बघितलेलं नाही. हिंदू एकता संघटना, बजरंग दल या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ही निदर्शनं केली आहेत.

नाटकाला विरोध का होतो हे शोधून काढलं पाहिजे. आजपर्यंत आमच्या नाटकाची 250 प्रयोग झालेत पण ज्यांनी ज्यांनी हे नाटक पाहिलं त्यांनी प्रशंसा केलीय. नाटक जेव्हा सुरू झालं तेव्हा काही लोकांनीही विरोध केला होता. पण त्यांनी हे नाटक न पाहताचा विरोध केला असं उघड झालं होतं. आताही तसंच झालंय. विरोधकांनी एकवेळेस नाटक पाहावं, त्याचा विषय समजून घ्यावा अशी प्रतिक्रिया निर्माता-दिग्दर्शक नंदू माधव यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2013 08:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close