S M L

2015 च्या वर्ल्डकपमध्ये भारताची सलामी पाकिस्तानशी !

Sachin Salve | Updated On: Jul 30, 2013 09:51 PM IST

Image img_236922_indiavspak4353_240x180.jpg30 जुलै : भारत विरुद्ध पाकिस्तान किक्रेट मॅच म्हणजे दुसरं युद्धचं..आता याच 'युद्धा'ने 2015च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या ब गटाच्या लढतीला सुरूवात होणार आहे. आज वर्ल्डकप स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झालाय. 2011 च्या चॅम्पियन टीम इंडियाची सलामी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडणार आहे. 2015 मध्ये 14 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा पार पडेल. स्पर्धेतला सलामीचा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संयुक्त यजमानांदरम्यान होणार आहे. भारताचा समावेश ब गटात झाला असून पहिली मॅच 15 फेब्रुवारीला होणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान 5 वेळा एकमेकांसमोर आलेले असून यापैकी एकही मॅच भारतानं गमावलेली नाही. ब गटामध्ये भारत आणि पाकिस्तानसह झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2013 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close