S M L

'खड्डे'बहाद्दर कंत्राटदारांना 2 कोटी 5 लाखांचा दंड

Sachin Salve | Updated On: Jul 31, 2013 10:25 PM IST

Image img_171372_khade_240x180.jpg31 जुलै : अख्ख्या मुंबईला खड्‌ड्यात घालणार्‍या कंत्राटदारांवर महापालिकेनं धडक कारवाईला सुरूवात केलीय. खड्‌ड्यांसाठी दोषी धरत मुंबई महानगर पालिकेनं दोषी कंत्राटदारांना 2 कोटी 5 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. तर एका सब इंजिनिअरवर निलंबनाची कारवाई केलीय. तसंच खड्डे बुजवण्याच्या निविदांची फेरतपासणी होणार असून दोषी कंत्राटदारांवर कडक कारवाईचे निर्देशही महापालिकेनं दिले आहेत. मंगळवारीच खड्‌ड्यांची नैतिक जबाबदारी स्विकारून स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी राजीनामा दिला. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेवाळेंचा राजीनामा फेटाळून लावला.

विशेष म्हणजे महापालिका,एमएसआरडीसी आणि बांधकाम खाते दरवर्षी शेकडो कोटी रुपये हे खड्डे बुजवण्यात खर्ची घालतात. पण, यामुळे कंत्राटदारांचं उखळ पांढरं होतं. लोकांचा जीव मात्र टांगणीलाच राहतो. मालाड कुरार हायवेजवळ उमेश शिंदे या तरुणाचा बाईक चालवताना खड्‌ड्यात पडुन मृत्यू झाला. तर वसईमध्येही आशा डमढेरे या महिलेचा खड्‌ड्यात पडुन मृत्यू झाला.

 

मुंबईचे रस्ते खड्‌ड्यात

  • खड्‌ड्यांची एकूण संख्या 15,418
  • 14,115 खड्डे बुजवण्याचं कंत्राट दिलं
  • 13,211 खड्डे बुडवणे सुरू
  • 12,000 खड्डे बुजवले

मुंबईतील सर्वाधिक लांबीचे रस्ते पालिकेचे आहेत. त्यानंतर एमएसआरडीसी, पीडब्लूडी, बीपीटी आणि एमएमआरडीए यांच्या अखत्यारीत रस्ते येतात. बीएमसीने यावर्षी 59 कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी राखून ठेवलेत. मात्र तरीही खड्‌ड्यांचं साम्राज्य दिवसेंदिवस पसरतच चाललंय. आता या खड्‌ड्यांमुळे दोन जणांना जीव गमवावे लागले त्यानंतर पालिकेनं धडक कारवाई सुरू केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2013 10:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close