S M L

अतिवृष्टीमुळे राज्यात 237 तर विदर्भात 106 बळी

Sachin Salve | Updated On: Aug 1, 2013 03:39 PM IST

vidharbh rai ntoday01 ऑगस्ट : विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय. पावसामुळे विदर्भात 106 जणांचा मृत्यू झालाय. तर राज्यातल्या मृतांचा आकडा 237 आहे. मृतांच्या वारसदारांसाठी सरकारनं अडीच लाखांची मदत जाहीर केलीय. तर विदर्भासाठी एकूण 2 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केल्याचा दावा सरकारने केलाय. यामध्ये तातडीची आणि दीर्घकालीन मदतीचा समावेश आहे. नागपूर, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरमध्ये पावसामुळे अतोनात नुकसान झालंय. बुधवारी झालेल्या पावसात नागपूर आणि परिसरातून तीन जण वाहून गेलेत. तर अमरावतीमध्ये मोर्शी इथल्या सिंभोरा धरणाचे 13 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेत. वर्धा जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.अप्पर वर्धा प्रकल्पाचे 13, लोअर वर्धा प्रकल्पाचे 31, बोर प्रकल्पाचे 8, बेंबळा प्रकल्पाचे 8 तर दरवाजे उघडण्यात आलेत.

विदर्भासाठी मदत जाहीर

- अतिवृष्टीमुळे राज्यात 237 जणांचा मृत्यू

- विदर्भातल्या मृतांचा आकडा 106

- विदर्भात 33 हजारांपेक्षा अधिक घरांचं नुकसान

- 4 लाख 961 हेक्टर शेतीचं नुकसान

- मृतांच्या वारसदारांना अडीच लाखांची मदत जाहीर

- अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठी 15 हजार

- खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 20 हजार

- पूर्णपणे वाहून गेलेल्या शेतजमिनीसाठी हेक्टरी 25 हजार

- रस्ते दुरुस्तीसाठी 600 कोटी

- पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी 5 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2013 03:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close