S M L

अंबानींचा 'महाल' वक्फ बोर्डाच्या जमिनीवर?

Sachin Salve | Updated On: Aug 2, 2013 01:38 AM IST

अंबानींचा 'महाल' वक्फ बोर्डाच्या जमिनीवर?

ambani house01 ऑगस्ट : मुकेश अंबानी यांची अँटेलिया बिल्डिंग वक्फ बोर्डाच्या जमिनीवर आहे आणि या गैरव्यवहाराची सीबीआय मार्फत चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधकांनी विधान सभेत केली आहे. वक्फ बोर्डात मंत्र्यांनी पैसे खाल्ले असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

 

या मुद्यावरून विरोधकांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसही धावून आली. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल उत्तर द्यावे अशी राष्ट्रवादीने मागणी केली आहे. या मागणी माध्यमातून राष्ट्रवादी आणि विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. या जमिनीच्या विषयाला घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला.

 

 

ठळक मुद्दे

 

- मुकेश अंबानींची अँटेलिया बिल्डिंग वक्फ बोर्डाच्या जमिनीवर

- अँटेलिया बिल्डींग मुकेश अंबानींची निवासी इमारत

- या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

- वक्फ बोर्डात मंत्र्यांनी पैसे खाल्ले असल्याचा फडवीसांचा आरोप

- देवेंद्र फडणवीस यांनी केला सभात्याग

- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधकांनी केली मागणी

- मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याची केली मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2013 10:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close