S M L

श्रीनिवासन यांच्या 'एंट्री'मुळे BCCI ची बैठक रद्द

Sachin Salve | Updated On: Aug 2, 2013 04:49 PM IST

Image img_239512_nshrinivasan_240x180.jpg02 ऑगस्ट : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेले बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्यामुळे बैठकच रद्द करण्याची नामुष्की ओढावली. बीसीसीआयची आज वर्किंग कमिटीची बैठक रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयमधून काही सदस्यांचाही श्रीनिवासन यांना विरोध आहे. या बैठकीला श्रीनिवासन आले असता सदस्यांनी एकच गदारोळ घातला त्यामुळे बैठक रद्द करण्यात आली असं सांगण्यात येतंय.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयने नेमलेली चौकशी समिती बेकायदेशीर आणि अवैध असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता. या पार्श्वभूमीवर आजची वर्किंग कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती.

पण न्यायालयाच्या निर्णयानंतरही बैठक घेतल्यास कायदेशीर पेच निर्माण होण्याच्या भीतीने बैठक रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे एन श्रीनिवासन यांचं पुनरागमन सध्यापूरतं टळलं असून बीसीसीआयच्या अध्यक्षपदी जगममोहन दालमियाच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2013 02:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close