S M L

मालेगाव प्रकरणात आरोपींनी वापरली 38 सिमकार्ड्स

27 जानेवारी, मालेगाव अजित मांढरे / रवींद्र आंबेकरमालेगाव बॉम्बस्फोटातील 11 आरोपींनी तब्बल 38 सिमकार्ड्स वापरली होती. आपल्या बोलण्याचा सुगावा पोलिसांना लागू नये यासाठी तब्बल 38 सिमकार्ड्स वापरली होती. पोलिसांना संशय येईल अशी थोडी जरी शक्याता आढळली तर मोबाइल नंबर बदलला जात होता. यासाठी कटातील आरोपींनी फोनवरून संभाषण केलं. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तासन्‌तास एकमेकांशी फोनवरून बोलत होते. मालेगाव स्फोटातील आरोपींनी कट रचण्यासाठी वारंवार बैठका केल्या ते फोनवरून एकमेकांशी संपर्कात होते. या साठी एकूण 38 सिमकार्डचा वापर केला. त्यासाठी त्यांच्या सतत बैठका आणि फोनवरून बोलणी सुरू होती. त्यात साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित, दयानंद पांडे, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, संदीप डांगे, रामचंद्र कलासंग्राम हे एकमेकांच्या सतत संपर्कात होते. यासाठी हे एकमेकांशी वेगवेगऴ्यानंबर वरून बोलायचे. त्यांनी एकून 38 फोननंबरचा वापर केला, त्यातील प्रज्ञा सिंग ठाकूर हिच्याकडे 2 मोबाईल नंबर होते, तर कर्नल पुरोहितकडे सहा मोबाईल नंबर, दयानंद पांडेकडं आणि अजय राहिरकरकडं 3 मोबाईल नंबर, सुधाकर चौधरीकडं 4 मोबाईल नंबर, रामचंद्र कलासंग्रामकडं सर्वात जास्त 8 मोबाईल नंबर, रमेश उपाध्यायकडं एक, शामलाल शाहू आणि समीर कुलकर्णीकडे 3 मोबाईल नंबर, शिवनारायण सिंग दोन, आणि रामजी सहा मोबाईल नंबर वरून हे एकमेकांशी संपर्कात असायचे. या प्रकरणातील आरोपीं ज्या मोबाईल फोनवरून एकमेकांशी संपर्कात रहायचे त्यातील काही फोन नंबर त्यांच्या नातेवायकांयच्या नावावर होते. तर काही बोगस नावानं त्यांनी हे फोन नंबर बाजारातून घेतले होते.मालेगाव बॉम्बस्फोटाआधी आणि बॉम्बस्फोटानंतरही पुरोहित आपल्या मोबाईल नंबर 9406524594 वरून सर्वांच्या संपर्कात होता. रेकॉर्डनुसार त्यानं साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला 15, अजय राहीरकरला 144 , सुधाकर चतुर्वेदीला 264 वेळा फोन केले होते. त्याचबरोबर दयानंद पांडेला 98 आणि समीर कुलकर्णीला 179 फोन केले होते. हे रेकॉर्ड तर पुरोहितच्या एकाच मोबाईल नंबरचे आहेत. त्याच्या इतर पाच नंबर वरूनही त्यानं अशाच प्रकारे सर्वांशी संपर्क केला होता.आणि त्यावेळी मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट अंतिम टप्प्यात होता.आपल्या कटाची माहिती एटीएसला लागलीय याची पूर्ण कल्पना कर्नल पुरोहितला होती. त्यानुसार त्यांनं पळायचीही तयारी केली होती, पण, त्याआधीच तो एटीएसच्या जाळ्यात अडकला. एटीएसच्या कारवाईतून निसटण्यासाठी ' वुई आर ऑन रडार ' ..असा एसएमएस पुरोहितनं आपल्या सहकार्यांना पाठवला होता. साध्वीच्या अटकेनंतर एटीएसला त्यांच्या मोबाईल नंबरचा सुगावा लागला आणि पोलिसांनी हे मोबाईल टॅप केले. या टॅपिंगमधून लक्षात आलं. कर्नल पुरोहित आणि रमेश उपाध्याय यांची एटीएसच्या तपासावर नजर होती. राजकीय नेत्यांशी त्यांचे असलेले संबंध आणि पोलीस दलातील काही अधिकार्‍यांकडून त्यांना एटीएसच्या हालचालीची माहिती मिळत होती. त्यावेळी ते खूप घाबरले होते. त्यादरम्यान मेजर रमेश उपाध्याय यांनी कर्नल पुरोहितला एक फोन केला होता. तो पोलिसांनी टॅप केला होता. तो फोन पुढीलप्रमाणं होतं. रमेश उपाध्याय : सर आपली चौकशी केली जातेय असं वाटतंय. चौकशी करणारे संभ्रमात आहेत. पण, याचा अर्थ असा नाही की ते आपल्यापर्यंत पोहचू शकत नाहीत. आपण त्यांच्या रडारवर असू शकतो. प्रसाद : 101 टक्के बरोबर आहे. आपण त्यांच्या रडारवर असणारच. पण, याचा अर्थ आपण टार्गेट आहोत असंही नाही. रमेश उपाध्याय, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ते आपल्यापर्यंत पोहचू शकतील . त्यामुळे आपण सुरक्षित राहिलं पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाहीए.मेजर उपाध्याय आणि कर्नल पुरोहित यांच्यातील ह्या संभाषणामुळेच पोलिसांचा त्यांच्यावरील संशय पक्का झाला. आणि एका मागोमाग एक 11 आरोपींना अटक झालीय. तर अजूनही तीन आरोपी फरार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2009 11:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2009 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close