S M L

'गुजरातींवर नाही,तर मोदींवर टीका'

Sachin Salve | Updated On: Aug 5, 2013 07:32 PM IST

'गुजरातींवर नाही,तर मोदींवर टीका'

naryan rane on nitish twit05 ऑगस्ट : उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणेंच्या वादग्रस्त ट्विटमुळे निर्माण झालेला वादावर खुद्द नारायण राणे यांनी मुलाची बाजू घेत खुलासा केलाय. आम्ही गुजराती समाजाबद्दल काहीच बोललो नाही. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं जे कौतुक होत आहे, त्यांच्याबद्दल जो चुकीचा प्रचार सुरू आहे त्याबद्दल बोललो होतो असा खुलासा नारायण राणे यांनी केलाय.

 

 

तसंच नारायण राणे आपल्या मुलाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसला खड्‌ड्यात पाडत आहे असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. फडणवीस यांच्या टीकेला राणेंनी उत्तर दिलंय. या विषयावर प्रतिक्रिया देण्याइतके फडणवीस मोठे नाहीत असा टोला राणेंनी लगावलाय. तर नितेश यांच्या ट्विटची चौकशी करण्याची घोषणा करणार्‍या गृहमंत्री आर आर पाटील यांना केली होती तर गृहमंत्र्यांनी इतर वक्तव्यांचीही चौकशी करावी असा सल्लावजा टोला राणेंनी लगावलाय.

 

गुजरातचा एवढाच जर विकास झाला असेल तर गुजरातींनी गुजरात जावं असं ट्विट नितेश राणे यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्विटमुळे मोठा वाद झाला होता. आता खुद्द नारायण राणे यांनी यावर खुलासा देत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2013 07:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close